Viral Video : प्रत्येक पूजेत नारळाचा वापर हा महत्वाचा आहे. एखादी नवीन गाडी घेतल्यानंतर किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी जाताना आपण गाडीसमोर सगळ्यात आधी नारळ फोडतो. नारळ हे फक्त फळ नसून धार्मिक दृष्ट्यादेखील याचे खूप जास्त महत्व आहे. जेवणासाठी ओलं खोबरं किंवा एखादा गोड पदार्थ बनवण्यासाठीसुद्धा अनेक जण नारळाचा वापर करतात; तर या नारळाच्या शेंड्यांना किंवा नारळाच्या करवंटीला खोबरं आणि पाणी काढून घेतल्यानंतर फेकून दिल्या जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का, या निरुपयोगी करवंटीपासून तुम्ही चहाचा कपसुद्धा बनवू शकता. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एका युजरने नारळाच्या करवंटीपासून एक मस्त कॉफी आणि चहा पिण्यासाठी कप बनवला आहे.

करवंटीपासून कप तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक नारळ घेतला आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतले आहेत.त्यानंतर नारळाच्या आतील खोबरं काढून घेऊन नारळाच्या आतील भाग पूर्ण साफ करून घेतला आहे. तसेच करवंटीच्या वरचा टणक भाग एका साधनाच्या सहाय्याने घासून घेऊन पूर्णपणे सपाट करून घेतला व त्याला गोलाकार कपसारखा आकार दिला आहे. नंतर कप पकडण्यासाठी दांडी आणि कप ठेवण्यासाठी खाली बेस तयार करून घेऊन त्यांना फेव्हीकॉलच्या सहाय्याने चिकटवण्यात आले आहे. नारळाच्या करवंटीच्या सहाय्याने कप बनवून इको फ्रेंडली लूक दिला आहे आणि कॉफी या शब्दाचे अल्फाबेट तयार करण्यात आलेल्या कपवर लावण्यात आले आहेत आणि अगदी शेवटी त्यात कॉफी ओतताना युजर तुम्हाला दिसून येईल. घरच्या घरी करवंटीपासून तयार केलेला कप तुम्हाला दुकानातील कपसारखेचं आकर्षित करेल. नारळाच्या करवंटीपासून तयार केलेला हा अनोखा कप एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

हेही वाचा…आलू टिक्की, कचोरी, वडा पाव…, ‘ही’ रेल्वेस्थानकं खाद्यपदार्थ्यांसाठी आहेत प्रसिद्ध; खाण्यासाठी स्थानकावर होते प्रवाशांची गर्दी

व्हिडीओ नक्की बघा :

नारळाच्या करवंटीपासून तयार केला कप :

अनेकदा पूजेसाठी किंवा मोदक बनवण्यासाठी नारळाचा उपयोग केला जातो. नारळाच्या करवंटीमध्ये झाडे लावून हँगिंग पॉट किंवा पक्षांसाठी पाणी पिण्यासाठी यांचा उपयोग करण्यात आलेला तुम्ही आजवर पहिला असेल. पण, करवंटीपासून चहासाठी कप तयार करण्यात आलेला तुम्ही आजवर पहिला नसेल; जो या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. नारळ फोडल्यानंतर शेंड्यांना किंवा करवंटीला फेकून देण्याऐवजी रोजच्या जीवनात तुम्ही त्याचा वापर करू शकता, ही कल्पना युजरने अनेकांपर्यंत व्हिडीओद्वारे पोहचवली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @craftofcoco या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहणारे अनेक जण युजरच्या मेहनतीला दाद देत आहेत. तसेच ‘करवंटीपासून खूप छान कप बनवला’ असे कौतुकदेखील कमेंटमधून करताना दिसून येत आहेत. तसेच ही कल्पना अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

Story img Loader