Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसवतात तर काही व्हिडीओ भावुक करतात. काही व्हिडीओ पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ तुम्हाला दिसेल की भाजीपाला विक्रेत्याता मुलगा सीए उत्तीर्ण झाला. वडीलांना तो ही आनंदाची बातमी कशी देतो, हे तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (vegetable sellers son became CA he showed result to his father at the vegetable stall watch Chhatrapati Sambhajinagar viral video)

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला एक तरुण दिसेल. जो मोबाईल घेऊन त्याच्या वडिलाजवळ जातो. त्याचे वडील भाजीपाला विक्रेते आहेत. ते स्टॉलजवळ झाडू मारत असतात. तितक्यात मुलगा त्यांच्याजवळ जातो आणि वडिलांना मोबाईलमध्ये निकाल दाखवतो. मुलगा पास झाल्याचे पाहून वडिलांचा आनंद गगना मावेनासा असतो आणि ते आनंदाने मुलाचे अभिनंदन करतात आणि जवळच्या एका व्यक्तीला सांगतात की मुलगा सीए झाला. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

हेही वाचा : चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

कोण आहे हा तरुण?

या तरुणाचे नाव हेमंत खांडखुळे असून तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे. नऊ वेळा अपयश आल्यानंतर दहाव्यांदा दिलेल्या परिक्षेत तो पास झाला आणि सीए बनला. त्याचे वडील भाजीपाला विक्रेते असून तो त्याच्या वडिलांना स्टॉलवर मदत सुद्धा करतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती

mpscvishwa आणि cahemantadhikrut या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलगा सीए झाल्यानंतर वडिलांना निकाल दाखवून सरप्राईज देताना..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तुझ्या बाबांनी त्यांच्या आनंद मनात साजरा केला त्याची किंमत ही करोडो मध्ये आहे” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक वडिलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण” अनेक युजर्सनी या तरुणाला अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader