Chandrayaan-3: भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सो नं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे.त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहे.हा आंनदी क्षण साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी इस्त्रोला सोशल मीडियावर वरून शुभेच्छा दिल्या. तर मुंबईकरही यामध्ये मागे नाहीत, मुंबईकरांनीही हा ऐतिहासिक क्षण खास करु दाखवला आहे. चांद्रयान ३ च्या लँडिंगनंतरचा मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही उर अभिमानानं भरून येईल.
मुंबईकर आणि मुंबई लोकल नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळीही मुंबईकरांनी त्यांचं वेगळंपण ऐतिहासिक क्षणाला दाखवून दिलं आहे. मुंबईकरांनी लोकल मध्ये राष्ट्रगीत गाऊन हा क्षण साजरा केला आहे. या आनंदी क्षणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लोकलमध्ये असलेल्या सर्व लोकांनी उभं रोहून आपलं राष्ट्रगीत गायलं आहे. यावेळी मुंबईकर नाही कर भारतीय म्हणून प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयासोबतच मुंबईकरालाही अभिमान वाटेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video Viral: काच फोडून पळून जाताना झाला अपघात; दोन्ही पाय निकामी, शून्य मिनिटांत मिळाले कर्माचे फळ
दरम्यान दुसरीकडे काल अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी भारत माता की जय असा घोषवारा करत जल्लोष साजरा करत आहे. यावेळी अंधेरी रेल्वे स्टेशनवर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. चांद्रयान चंद्रावर पोहचल्यावर नागरिकांचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. विविध ठिकाणी फटाके फोडून हा आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी भारत माता की जय असा घोषवारा करत नागरिक हा क्षण साजरा करत आहे.