Viral Video: पाऊस, ९० च्या दशकातील जुनी गाणी व चहा, असा एकत्रित मिलाफ म्हणजे चहाप्रेमींसाठी स्वर्गसुख… चहाप्रेमी म्हणजे आताच्या काळात ज्यांना ‘टीलव्हर’ असं म्हटलं जातं; जे चहा घेणार का, असं म्हटल्यावर कधीच नाही म्हणत नाहीत. तसेच या चहाप्रेमींसाठी मार्केटमध्ये विविध प्रकारचे चहादेखील उपलब्ध असतात. अशातच अनेकांना टपरीवरचा किंवा एखाद्या स्टॉलवर चहाचा स्वाद घ्यायलाही आवडतो. तर, आज अशाच एका चहाविक्रेत्याची चर्चा होत आहे; जो गाणं गाऊन चहाप्रेमींना आकर्षित करतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुरतचा आहे. सुरतच्या डुमास येथे स्थायिक विजयभाई पटेल अनेक वर्षांपासून त्यांचं चहाचं दुकान चालवीत आहेत. विजयभाई पटेल यांनी बनविलेल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी येथे लोक दूरवरून तर येतात. पण, ते त्यांचा मधुर आवाज ऐकूनही मंत्रमुग्ध होतात. कारण- ते चहा बनवीत असतानाच त्यांच्या मधुर आवाजात सुरेल गाणीदेखील गात असतात. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. विजयभाई पटेल यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत कोणतं गाणं गायलं आहे ते एकदा तुम्हीसुद्धा ऐका.

हेही वाचा…मुंबईत येताचं इटालियन आजीला साडी नेसण्याचं लागलं वेध; ‘तिचा’ हट्ट नातीने केला असा पूर्ण; पाहा प्रेमळ VIDEO अन् गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विजयभाई पटेल १९७२ च्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातील किशोर कुमारचा चार्टबस्टर ‘चिंगारी कोई भडके’ हे गाणं गात, त्यांच्या स्टॉलवर चहा तयार करताना दिसत आहेत. विजयभाई पटेल एका शेगडीवर चहा बनवीत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला त्यांनी हातात माईकसुद्धा धरला आहे आणि स्टॉलच्या एका साईडला त्यांचा मोबाईल ठेवून, त्यातील गाण्याच्या ओळी वाचून ते गाणं सादर करीत आहेत. डॉली चायवालानंतर, सुरतच्या ‘गाणं गाणाऱ्या चहाविक्रेत्याच्या’ हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

इन्स्टाग्रामवर मुंबईचे सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांच्या @viralbhayani या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘विजयभाई पटेल यांनी बनविलेला चहा आणि त्यांचा आवाजही मधुर वा गोड आहे. विजयभाईंचा चहा प्यायला व त्यांची गाणी ऐकायला लोक लांबून येतात’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात सुरतच्या या चहाविक्रेत्याला दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून ‘चहा विकण्याचा उत्तम मार्ग, व्वा!’, ‘खूप छान’ अशा शब्दांतून नेटकरी विक्रेत्याच्या विक्री कौशल्यासह त्याच्या आवाजाचेही कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video featuring vijaybhai patel seen preparing tea at his stall while singing kishore kumar chingari koi bhadke song must watch asp
Show comments