‘दैव तारी त्याला कोण मारी’ याचा परिचय नुकताच व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून आला. दोनदा कारनं धडक दिल्यानंतरही एक महिला अपघातातून सुखरूप बचावली, विशेष म्हणजे तिला फक्त किरकोळ जखमा झाला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ CGTN ने आपल्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केला आहे.

चीनमधल्या एका रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. ही महिला वर्दळीच्या रस्त्यावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण, समोरून येणाऱ्या गाडीची धडक तिला बसली आणि ती गाडीखाली आली. चालकानं आणि रस्त्यावरच्या इतर लोकांनी तत्परतेनं या महिलेला गाडीखालून बाहेर काढलं. ही महिला गाडीखालून बाहेर येते न येते तोच गाडीत असणाऱ्या लहान मुलानं चुकून गाडी सुरु केली. त्यामुळे या महिलेच्या अक्षरश: अंगावरून पुन्हा एकदा गाडी गेली. पण, एवढा भयंकर अपघात होऊनही ही महिला आश्चर्यकारकरित्या बचावली. तिला काही किरकोळ जखमा झाल्या.

Story img Loader