आज काल लोक काय करतील याचा नेम नाही. लोक कधीही कुठेही काहीही करू शकतात. अशा घटनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या दिल्ली मेट्रोतील एक पोस्च सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये चक्क आरामात लोळत मोबाईल पाहत आहे. व्हायरल पोस्ट पाहून नेटकरी चक्रावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली मेट्रो सतत काही ना काही गोष्टीमुळे चर्चेत असते. कधी मेट्रोमध्ये कोणी डान्स करताना दिसते तर कोणी भांडताना दिसते, कधी कोणी अश्लील चाळे करताना दिसतात. आता तर हद्दच झाली आहे. मेट्रोमध्ये एक व्यक्ती घरात बेडवर लोळत असल्यासारखा लोळत आहे. आरामात मोबाईल घेऊन मेट्रोमध्ये पाय पसरून लोळताना दिसत आहे. मेट्रोतील इतर प्रवाशांकडे दुर्लक्ष करत हा व्यक्ती फोन बघण्यात व्यस्त आहे. या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

एक्सवर @ShikharSha34718 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तर आजकाल दिल्ली मेट्रोमध्ये काय चालले आहे?” प्रिय @OfficialDMRC @DelhiPolice कृपया सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोच्या मजल्यावर बसलेल्या प्रवाशांवर कारवाई करा”

हेही वाचा – नागपूरमध्ये हे काय सुरू आहे? शुद्धीत नसलेल्या मैत्रिणीला मदत करायला गेला अन् तिला घेऊन धाडकन आपटला

हेही वाचा –कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात व्हॉलीबॉल खेळत आहेत हे तरुण, Viral Video पाहून आठवतील बालपणीचे दिवस

व्हिडिओ पोस्ट करून एकाने अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन केले. दरम्यान व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “@OfficialDMRC तुम्ही याबद्दल काय करत आहात किंवा सहप्रवाशांकडून पैसे घेत आहात?” दुसरा म्हणाला, “अर्थातच. मेट्रोची प्रतिष्ठा ढासळू नये यासाठी कडक नियम पाळवे लागेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video has gone viral showing a person lounging comfortably with their legs apart engrossed in their mobile phone while riding the delhi metro snk