सध्या गुजरातमधील सुरत येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिला शिक्षिकेने लहान मुलीला बेदम मारहाण केल्याचं दिसत आहे. शिक्षिकेने मुलीला केलेली मारहाण वर्गात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मारहाण करणाऱ्या शिक्षकेवर कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण साधना निकेतन शाळेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महिला शिक्षिका मुलीच्या शेजारी बसलेली दिसत आहे. यावेळी ती अचानक लहान मुलीला मारहाण करायला सुरुवात करते. यावेळी ती लहान मुलीला जवळपास ३० ते ३५ वेळा थप्पड मारते.

हेही पाहा- मुंबई लोकलमध्ये प्रवाशांचा राडा; धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला खाली ढकलण्याचा प्रयत्न, भयानक घटनेचा VIDEO आला समोर

पोलिसांनी केली शिक्षिकेला अटक –

मुलीच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला शिक्षिकेला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचं नाव जशोदाबेन खोखरिया असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तर या शिक्षिकेने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओत शिक्षिका मारहाण करत असताना लहान मुलगी भीतीने रडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

मुलीच्या पालकांनी सांगितले की, मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या शरीरावर खुणा होत्या. याबाबत मुलीला विचारले असता तिने काहीच सांगितले नाही. त्यामुळे आम्ही शाळा जाऊन मुख्याध्यापकांशी याबाबत चर्चा केली आणि वर्गात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले, यावेळी शिक्षकेने मुलीला मारहाण केल्याचे दिसून आलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिला शिक्षिकेला अटक केली. तर मुलीला मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय एक शिक्षिका ४ वर्षाच्या मुलीला एवढी बेदम मारहाण कशी करु शकते? असा प्रश्नदेखील अनेकजण विचारत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a 4 year old girl being brutally beaten by a teacher and slapped 35 times in a row has come to light jap
Show comments