Viral Video: एखाद संकट आपल्या समोर ठाण मांडून उभं राहीलं आहे की, संकटाच्याकाळी मित्र मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यांच्या आधी शेजारी धावून येतात. त्यामुळेच शेजारी हे आपले पहिले नातेवाईक असतात. चाळ असो किंवा बिल्डिंग शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला प्रचंड महत्त्व असते. प्रेमळ, मदत करणारे, भांडखोर असे सगळे प्रकार शेजाऱ्यांमध्ये असतात. तरीही संकटकाळी एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्तीही त्यांच्यामध्ये असतेच. तर आज सोशल मीडियावर सुद्धा असंच पाहायला मिळालं आहे. एक ९४ वर्षाय आजोबा शेजारी राहणाऱ्या आजारी व्यक्तीस गरमागरम सूप घेऊन गेले आहेत.
व्हिडीओ परदेशातील असला तरीही येथे अगदी भारताप्रमाणे शेजारधर्म साकारताना आजोबा दिसून आले आहेत. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची तब्येत खराब आहे असे ९४ वर्षीय आजोबांना समजते. ते लगेच घरी चिकन सूप तयार करतात. एका भांड्यात घालून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरापाशी घेऊन जातात. आजोबा दरवाजाची बेल वाजवतात. व्यक्ती घराबाहेर येते आणि ‘येथे काय करतायं’ ? असं आजोबांना विचारते. आजोबा आणि शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमध्ये नेमकं काय संभाषण झालं हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तब्येत खराब असल्याचे समजल्यानंतर आजोबा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसाठी भांडयातून घरी बनवलेलं चिकन सूप घेऊन जातात. शेजारी राहणारा रहिवासी बाहेर येतो आणि ‘येथे काय करतायं’ असे आजोबांना विचारतो. तेव्हा आजोबा म्हणतात की, तुझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी चिकन सूप घेऊन आलो आहे असे सांगतात आणि दोघे बराच वेळ प्रेमळ संवाद साधतात. तसेच काही वेळाने भांड्यात असलेलं चिकनचे सूप रहिवाशाकडे सोपवतात व निघून जातात.
अनेकदा आई आजारी असेल किंवा कुटुंबातील सदस्य गावी गेले असतील. तर शेजारी आपल्याला जेवण देतात, आपली सतत विचारपूस करतात. आपल्याला हवं नको ते पाहतात आदी सगळ्याच गोष्टींची काळजी घेतात. तर अगदी तसंच काहीतरी या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. शेजारी राहणारा रहिवासी आजारी असल्यामुळे त्याची विचारपूस करण्यासाठी, त्याच्याकडे चिकन सूप घेऊन गेले. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @goodnews_movement या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.