आपल्या परिस्थितीवर नाराज होण्यापेक्षा, ज्या लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी जीवाचा धोका पत्करुन कामं करावी लागतात, एकदा त्यांना भेटा, मग तुम्ही किती सुखी आहात याचा अंदाज येईल, असं आपणाला अनेकदा वरिष्ठांकडून सांगितलं जातं. कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जगण्यासाठी दररोज भयंकर संघर्ष करावा लागतो. शिवाय केवळ संघर्षच नव्हे तर जीवघेणा धोकाही पत्करावा लागतो. सध्या अशाच एका संघर्ष करणाऱ्या युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करायचे की, त्याच्या परिस्थितीची कीव करावी हेच समजत नाहीये.
व्हायरल व्हिडीओमधील तरुण एका इमारतीच्या बांधकामासाठी अत्यंत उंच मचानवर धोकादायक पद्धतीने बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर अनेक नेटकरी संतापले आहेत. या मजुराला अशा धोकादायक पद्धतीने बसवून त्याच्याकडून काम कसे करुण घेत आहेत? थोडा जरी तोल गेला तर त्याच्या जीवाला खूप धोका असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या मजुराच्या सेफ्टीची कोणतीही काळजी त्याच्या ठेकेदाराने घेतलेली नाही. त्यामुळे लोक ठेकेदारावर संतापले आहेत.
हेही पाहा- Video: स्टाईलमध्ये चहाचं पॅकिंग करणं पडलं महागात; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
व्हायरल होत असलेला व्हिडीओ डॉक्टर शौकत शाह नावाच्या ट्विटर अकाऊंटरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बांधकाम मजूर उंच ठीकाणी एका फळीवर बसलेला दिसत आहे. शिवाय यावेळी त्याला कसलीही सुरक्षा दिलेली नाही, या तरुणाने हेल्मेटही घातलेली नाही, त्याला कसलाही आधार दिला नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मजूर काम करताना थरथर कापत असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “त्याचे कौतुक करण्याची गरज आहे” असं लिहिलं आहे.
हेही पाहा- बापरे! कारच्या धडकेत चक्क इमारतच कोसळली, धक्कादायक Video पाहून नेटकरी झाले थक्क
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी परिस्थिती एखाद्याला कोणत्या धोकादायक ठिकाणी घेऊन जाते याचं हे उदाहरण असल्याचंही म्हटलं आहे. तसंच या कामगाराच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही अनेक लोकांनी केली आहे. एका यूजरने लिहिले की, “या मुलाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे, हे स्तुती करण्यासारखं नाही, त्याला कायदेशीर संरक्षण मिळायला हवे आणि त्याचा जीव धोक्यात घातल्याबद्दल त्याच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.” तर आणखी एका नेटकऱ्याने “या कामगाराला सुरक्षा उपकरणे द्यायला पाहिजे होती असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.