सोशल मीडियावर निष्काळजीपणाने गाडी चालवणाऱ्या मुला-मुलींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून आपणाला अनेकदा त्यांचा राग येतो. कारण हे लोक वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर स्टंटबाजी करत असतात. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये मुलांसह मुलींचाही समावेश असतो. सध्या अशाच एका मुलीचा व्हिडीओ समोर आले आहे. ज्यामध्ये ती बाईक चालवताना जीवघेणा स्टंट करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या मुलीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालतांना अपघाताला सामोरं जावं लागलं आहे.
इंटरनेटवर मुलींचे असे असंख्य व्हिडिओही व्हायरल होतात, ज्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हिंगमुळे इतरांना त्रास होतो. शिवाय अशा व्हिडींओमुळे त्या ट्रोलदेखील होत असतात. मुलींचे असे मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात जे पाहून आपलंही मनोरंजन होतं. परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मुलीचे कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कारण या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध तिची बाईक वेडीवाकडी आणि अतिशय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. तर या मुलीची बाईक चालवण्याती पद्धत तिच्यासाठी आणि इतरांसाठीही धोकादायक ठरली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सुरुवातीला हसायला येत आहे, पण थोड्या वेळाने असं काही घडतं जे पाहून तुम्हालाही त्या मुलीचा राग आल्याशिवाय राहणार नाही.
पुढे काय झाले ?
व्हिडीओतील मुलगी निष्काळजीपणाने बाईक चालवताना दिसत आहे. त्याचवेळी मागून एक बाईकस्वार आपल्या पत्नीसह त्या रस्त्यावरुन जाताना तो त्या मुलीच्या शेजारून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी बाईक चालवणारी मुलगी अचानक त्या त्याच्या आडवी येते. ज्यामुळे बाईकवरचे जोडपे खूप जोरात खाली पडते, शिवाय ती मुलगीही खाली कोसळते. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या दोघांनाही गंभीर जखमा झाल्या असतील असं दिसतं आहे.
मुलीवर नेटकरी संतापले –
या मुलीच्या निष्काळजीपणाने स्टंट करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mcqueen_spee_d नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी मुलीवर चांगलेच संतापले आहेत. शिवाय ते या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “हे लोक स्वतःचे नुकसान करतात आणि त्याच वेळी इतरांना त्रास देतात. दुसर्याने लिहिले आहे की, “या मुलीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तेव्हाच अशा लोकांना अक्कल येईल.”