एखादं पार्सल मागवलं की ते लवकरत लवकर यावं असं सगळ्यांना वाटतं. खास करुन काही खायचे पादार्थ मागवले तर ते गरम गरम खाता आले पाहिजेत यासाठी लवकर डिलिव्हरी व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. कंपनीही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पार्सल पोहचवण्याचा प्रयत्न करते. तरीही काहींना वाटतं की पाच मिनिटांत पार्सल घरपोच झालं पाहिजे. हे प्रत्यक्षात शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल पण आपलं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आता तुम्ही ऑर्डर केलेलं तुम्हाला पुढच्या पाच मिनिटांत सहज मिळणार आहे. कारण आता डिलिव्हरी बॉय थेट हवेतून उडत उडत तुमचं पार्सल घेऊन येणार आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हे नक्की कुठे सुरुय ? चला जाणून घेऊ..
आतापर्यंत आपण ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर आपली वस्तू डिलिव्हरी बॉय स्कूटरवरुन किंवा कारमधून आणल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र ऑनलाईन डिलिव्हरीबाबत दुबईमध्ये वेगळाच प्रयोग करण्यात आला आहे. दुबईत एका डिलिव्हरी बॉयनं चक्क हवेत उडत येत वस्तू डिलिव्हरी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञानानं लोक नेहमीच अवाक् होत असतात, आता हे उडणारे डिलिव्हरी बॉय पाहून तुम्हीही दुबईच्या पुन्हा प्रेमात पडाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक डिलिव्हरी बॉय जॅकेट घालून आकाशातून उडत उडत खाली येतो आणि ब्रिजवर उभा असलेला व्यक्ती त्याला हात दाखवताच तो त्याच्या दिशेने खाली येतो. यानंतर तो त्या व्यक्तीला त्याच पार्सल देतो. अवघ्या १५ मिनिटांत डिलिव्हरी असं कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: सबसे कातिल गौतमी पाटीलची परदेशातही क्रेझ; भारतीय तरुणानं युकेमध्ये केला गौतमीच्या लावणीवर डान्स
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @mindscapezz या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. एकानं म्हंटलं आहे, “आमच्याकडे इतक्या तारा आहेत की तो त्यातचं अडकून जाईल.”