अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच, शिवाय कष्ट करुन जीवन जगायचं म्हटलं तरीही त्यांना ते कष्ट करता येत नाहीत. कारण नियतीने त्यांना संपुर्ण शरीरच दिलेलं नसतं ते अपंग असतात. मात्र, सध्या अशा एका अपंग व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्या जिद्दीचे नक्कीच कौतुक वाटेल आणि त्याच्या परिस्थितीची किवही येईल.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की, काही लोकांचे जीवन किती भयंकर आणि कठोर असते. व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीला एक पाय नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याने आपल्या एका हातात कुबडी आणि दुसऱ्या हातात तीनचाकी सायकल हॅंडल पकडला आहे. शिवाय या सायकलच्या मागे काहीतरी सामान आहे. त्यामुळे हा व्यक्ती हे सामान कुठेतरी पोहचवण्याचे काम करत असल्याचंही दिसत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

हेही पाहा- १०८ किलो वजन कमी करुनही अनंत अंबानीचे वजन पुन्हा कसे वाढले? ‘ही’ कारणे जाणून तुम्हीही थक्क व्हाल

हा व्हायरल व्हिडिओ @AamirKhanfa नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जगायचं असेल तर काही प्रयत्न करावे लागतील, स्वर्ग पाहायचा असेल तर स्वत:ला मारावं लागेल’, ११ सेकंदाच्या क्लिपमध्ये, एका पायाने अपंग असलेला माणूस एका हाताने कपड्यांनी भरलेली जड हातगाडी ओढताना दिसतं आहे. तर दुसऱ्या हातात त्याने नीट चालता यावे म्हणून त्याची कुबडी धरली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तर अनेकांनी या व्यक्तीसाठी सहानभुती व्यक्त केली आहे.

हेही पाहा- मगरीच्या अंगावर बसून भरधाव वेगाने बाईक चालावतोय ‘हा’ तरुण; Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ६१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्यक्तीच्या कष्ट करण्याच्या जिद्दीचे अनेकांनी कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केल्या आहेत. एका व्यक्तीने सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘या जीवनात गरींबाच्या वाट्याला खूप दु:ख आहेत.’ दुसर्‍या वापरकर्त्याने ‘त्यांना आशीर्वाद द्या.’ असं लिहिलं आहे.

Story img Loader