सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेंड येत असतात, त्यामध्ये कधी गाणी, डान्स तर कधी एखादा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या या ट्रेंडची लोकांना इतकी भुरळ पडली आहे की, अनेकजण ते ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. देशातील नागरिकांचा वाढता सोशल मीडियाचा वापर पाहून आता शिक्षकांनादेखील रील्स बनवण्याचा मोह आवरता येत नसल्याची अनेक उहाहरणं समोर येत आहेत. नुकतेच एका शाळेतील शिक्षकांनी, ‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ या गाण्यावर केलेलं रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. अशातच आता याच गाण्यावर एका महिला शिक्षकेने मुलांसोबत केलेला जबरदस्त डान्स व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२२ या वर्षात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ ट्रेंड करत होते. या ट्रेंडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आणि सोशल मीडियावर राज्य केलेल्या गाण्यांमधलं ‘पतली कमरिया मोरी’ हे एक गाणं आहे. या गाण्यायवरती अनेक लोकांनी रील बनवून ते आणि सोशल मीडियावर शेअर केल्याचं आपण पाहिलं आहे. नवीन वर्षातदेखील या गाण्याची क्रेझ कमी झाली नसल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला शिक्षका क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत ‘पतली कमरिया मोरी’ या गाण्यावर डान्स केल्याचं दिसत आहे. व्हिडीओतील महिला शिक्षिकेने मुलांसोबत केलेला डान्स अनेकांना आवडला आहे.

हेही पाहा- कौतुक करावं की परिस्थितीची कीव? तरुणाच्या जगण्याचा संघर्ष पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न, Video एकदा पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, अनेक विद्यार्थी वर्गात बेंचवर बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांनी डोक्यावर सांताक्लॉजच्या टोप्या घातल्याचंही दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ ख्रिसमसच्या दरम्यानचा असल्याचं दिसत आहे. याचवेळी शाळेत धमाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत महिला शिक्षकही ‘पतली कमरिया मोरी’ या गाण्यावर थिरकल्याचं दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- शाळेच्या ड्रेसमध्ये या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, व्हायरल Video एकदा पाहाच

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अलिशा कॅथरीन नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तो लाखो लोकांनी पाहिला आणि लाईकही केला आहे. अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a female teacher dancing to patli kamaria mori song in front of students in class is going viral jap