आपल्या देशात विविध देशी जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, हे जुगाड फक्त आपल्याच लोकांना वापरता येतं आणि तेच त्याचा लाभ घेऊ शकतात. इतर देशातील लोकांना आपल्या या जुगाडाचा वापरही करता येत नाही. हो कारण सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी हेच म्हणत आहेत की, “आपला जुगाड आपणच वापरु शकतो, परदेशी व्यक्तींना तो वापरणं जमणार नाही.” तर नेटकरी असं का म्हणत आहेत? ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच लक्षात येईल.

आपल्या देशातील जुगाडू लोक हे एखाद्या साधनाची जर कमतरता भासत असेल तर त्यासाठी पर्याय शोधतात आणि त्यातून काहीतरी नवीन शोध लागतो. असे अनेक भारतीय लोक अवघड काम सहज पूर्ण करण्यासाठी नवनवीन गोष्टींचा शोध लावतात किंवा एखादी गोष्ट ऐनवेळी उपलब्ध होऊ शकणार नसेल तर त्यासाठी ते पर्यायी मार्ग शोधतात.

virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हेही पाहा- Video : मै झुकेगा नही! नागपूरच्या मैदानात डेव्हिड वॉर्नरला चढला ‘पुष्पा’ फिव्हर, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडिओत असाच प्रसंग उद्भवला आहे. पावसाळ्यात लोक सहसा रेनकोट आणि छत्री वापरतात. मात्र, अचानक पाऊस आला आणि आपल्याजवळ छत्री नसेल तर अनेक भारतीय लोक प्लास्टिकचा कागद किंवा इतर कोणत्याही वस्तूने स्वतःचं पावसापासून संरक्षण करतात. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला असेच काही दृश्य पाहायला मिळत आहे.

पावसात भिजू नये म्हणून जुगाड केला अन्…

हेही पाहा- Viral Video : पाकिस्तानी तरुणीला पाहताच प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या, ‘लैला मै लैला’ गाण्यावर अशी काही थिरकली…

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘लैड बाइबल’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक विदेशी महिला शॉपिंग कॉम्प्लेक्समधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी पाऊस पडायला सुरुवात होते. त्यामुळे ही महिला भिजू नये म्हणून जुगाड करते. ती तिच्या डोक्यावर प्लास्टिकचा टब ठेवते आणि स्वतःला भिजण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते.

सध्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “जुगाड तंत्राचा वापर फक्त भारतातील लोक करू शकतात.” तर या महिलेने हा टब पुर्णपणे तोंडावर धरल्यामुळे तिला समोरचं दिसलं नसल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

Story img Loader