सध्या सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मेट्रोमध्ये अनोखे व्हिडीओ बनवणे हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. कारण अनेक तरुण तरुणी मेट्रोत जाऊन वेगवेगळे स्टंट करतात आणि ते व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये कधी एखादा तरुण चक्क टॉवेल गुंडाळून मेट्रोत प्रवेश करतो तर कधी कोणी तरुणी मेट्रोत लटकताना दिसते. त्यामुळे अनेकजण फेमस होण्यासाठी मेट्रोत काहीही स्टंट करणारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच आता आणखी एका मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून नेटकरी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही वापरकर्त्यांना या मुलीचा अवतार आवडला असून व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.इंस्टाग्राम रील बनवणाऱ्यांसाठी मेट्रो हा जणू अड्डाच बनला आहे. त्यामुळे काहीजण मेट्रोत प्रवास करण्यासाठी नव्हे तर फक्त रील काढण्यासाठी येतात की काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यामध्ये तरुण रीलसाठी मेट्रोमध्ये विचित्र स्टंट करताना दिसतात. अशातच आता एक मुलगी मेट्रोत ‘भूल भुलैया’ची ‘मंजुलिका’ बनून चढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही पाहा- ‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”

व्हायरल होत असलेल्या या मुलीचा व्हिडीओ the.realshit.gyan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओध्ये ‘मंजुलिका’च्या गेटअपमध्ये मेट्रोमधून प्रवास करणारी एक मुलगी दिसत आहे. जी मंजुलिका सारखी हावभाव करुन प्रवाशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

यावेळी ती एका मोबाईलमध्ये पाहण्यात व्यस्त असणाऱ्या तरुणाकडे जाते आणि त्याला धक्का देते यावेळी, तरुणीचा अवतार पाहताच तो घाबरून सीटवरुन पळातो आणि यानंतर ती मुलगी तरुणाच्या जागेवर बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकान लिहिलं आहे की, ‘हे सगळं काय चाललंय मेट्रोत?’ तर आणखी एकाने, ‘सार्वजनिक ठिकाणी असले कृत्य करणाऱ्या मुलीवर टीका केली आहे. तर एका नेटकऱ्याने या मुलीने ओव्हर अॅक्टींग केल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a girl doing a strange reel in delhi metro has gone viral jap
Show comments