सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, अशा प्रकारचे अनेक फलक आपण दररोज पाहत असतो. पण अनेकजण याच फलकांच्या शेजारी इतर नागरिकांच्या आरोग्याचा कसलाही विचार न करता सिगारेट पिताना दिसतात. असे लोक रस्त्यावर, एसटी आणि रेल्वेमधून प्रवास करतानाही सिगारेट पिताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी रेल्वे प्रवासादरम्यान इतर प्रवांशासमोर सिगारेट पिताना दिसत आहेत. जे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
आपल्या देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवाशांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे नियम आणि कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना कोणीही धूम्रपान करू शकत नाही. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी धावत्या ट्रेनमध्ये सिगारेट ओढताना पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत रेल्वे प्रशासनाकडे या मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही पाहा- शर्यतीत धावणाऱ्या बैलाला मारणं तरुणाच्या अंगलट; Video पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म तैसे फळ”
हा व्हिडिओ एका एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने तो रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनादेखील तो टॅग केला आहे. शिवाय त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ही मुलगी ट्रेनमध्ये रात्रभर गांजा आणि सिगारेट पिताना दिसली. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेनच्या टब्यात खूप गर्दी असतानाही तिने हे गैरकृत्य केलं.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने त्याची दखल घेतली असून रेल्वेने या ट्रेनच्या प्रवासाचा तपशील, पीएनआर, ट्रेन नंबर आणि मोबाईल नंबर शेअर करण्यास सांगितले आहे. याशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना होणार्या कोणत्याही गैरसोयीचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी १३९ नंबर डायल करून तुमची तक्रार नोंदवू शकता असंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.