सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला पोट धरुन हसवतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करतात. शिवाय कधीकधी असेही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्या डोळ्यांवरती विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या स्टंटचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा रहदारीच्या रस्त्यावर अप्रतिम असा स्टंट करताना दिसत आहेत.
खरं तर सध्याच्या तरुणाईमध्ये विविध स्टंट करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. ते अनेकदा वेगवेगळे स्टंट करुन त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो तरुणांचा नाही तर एका आजोबांचा आहे. शिवाय व्हिडीओमधील आजोबांनी असा काही स्टंट केला आहे. जो पाहून नेटकरी ‘वय म्हणजे केवळ आकडा असतो’, असं म्हणत आहेत.
हेही पाहा- Viral video: सीट बेल्ट लावला असता तर…अपघातात कार चालकाची भयाण अवस्था
आजोबांच्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल-
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक वयस्कर आजोबा सायकलच्या सीटवर न बसता हँडलवर बसल्याचं दिसत आहेत. शिवाय यावेळी त्यांचे तोंड देखील सायकलच्या विरुद्ध दिशेला आहे. अशा परिस्थितीतही ते आजोबा भरधाव वेगाने सायकल चालवत असल्याचं पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय रहदारीचा रस्ता असल्यामुळे अनेक वाहनांची वर्दळदेखील या रस्त्यावर दिसत आहे.
आजोबांच्या या अप्रतिम स्टंटचा व्हिडीओ casualmultanis नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २.४ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर १ लाख ७१ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, कमेंट बॉक्समध्ये अनेकजण आजोबांचे कौतुक करताना दिसत आहेत.