दारुच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात, तर काही पोलिसांशी हुज्जत घालतात, याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या गुरजारतमधील एका महिलेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून दारूबंदी लागू आहे, मात्र तरीही अनेक लोक दारुच्या नशेत आढळतात. अशातच आता एका महिलेने दारूच्या नशेत पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक गुजरातमधील दारू बंदीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
मद्यधुंद महिलेचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओतील महिला दारूच्या नशेत गाडी चालवत होती म्हणून पोलिसांनी तिला थांबवलं, मात्र तिला पोलिसांनी थांबवल्याचा राग आला आणि ती पोलिसांचे व्हिडिओ शूट करु लागली. यावेळी पोलिसांनी तिचा मोबाईल घेतल्यामुळे ती संतप्त झाली आणि गाडीतून उतरुन पोलिसांशी वाद घालू लागली. बराच वेळ तिचा गोंधळ वडोदराच्या रस्त्यावर सुरू होता, ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांशी झटापट
व्हिडिओमधील महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी एक महिला पोलिसाने तिला शांत करण्याचा प्रयत्न करायला जाताच ती पोलिसांवर हात उचलण्याचा प्रयत्न करते. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला एक प्रसिद्ध कलाकार सून तिने दारूच्या नशेत बराच वेळ रस्त्यावर गोंधळ घातला होता.
व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
महिलेचा दारुच्या नशेतील व्हायरल व्हिडिओवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिते आहेत. @VitanParmar नावाच्या युजरने लिहिलं, “तुम्ही एखाद्या पुरुषाला पोलिसांबरोबर असं काही करताना पाहिले आहे का? आणि ती एवढी शिवीगाळ करत आहे आणि ती एक स्त्री आहे म्हणून सगळे पोलीस तमाशा बघत आहेत, नाहीतर ती जर पुरुष असती तर पोलिसांनी त्याला आतापर्यंत फोडले असते.” दुसर्याने लिहिलं, “महिलेवर कारवाई व्हायला हवी पण तिने दारू कोठून आणि कशी आणली, याचा आधी तपास व्हायला हवा. पंतप्रधानांच्या गृहराज्यात अनेक वर्षांपासून दारूवर बंदी आहे.”