सोशल मीडियावर सध्या कर्नाटकातील एका थरारक घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओमधील बस चालकाने मोठ्या हुशारीने बस जागीच थांबवल्यामुळे एका महिलेचा जीव बचावला आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर जो-तो या बस चालकाचे कौतुक करत आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल –

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटकातील मंगळुरू येथील आहे. येथील एक महिला रस्ता ओलांडत होती. मात्र तिचे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसकडे लक्ष नव्हते. शिवाय रस्ता ओलांडताना ती इकडे तिकडे न पाहता पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना, मागून अचानक एक भरधाव बस येते,महिला बसखाली जाणार असं वाटतं, तोपर्यंत चालक ऐनवेळी बस जागीच थांबवतो, ज्यामुळे महिला थोडक्यात बचावल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा- प्रेयसीचा बोलण्यास नकार, तरुणाने संपवलं आयुष्य; तर कुटुंबीयांना हत्येचा संशय, पोलीस म्हणाले “मुलीबरोबर…”

महिला अचानक बससमोर आली अन्…

रस्त्याच्या मधोमध महिलेला पाहून बस चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्याच व्हिडीओत दिसत आहे. शिवाय यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या महिलांना वाचवण्याचे आव्हान बसचालकासमोर होते, मात्र त्याने ज्या प्रकारे दोन्ही महिलांना वाचवले आहे, जे पाहून तुम्हीदेखील चालकाचे कौतुक कराल, यात शंका नाही.

बसचालकाने जिंकली नेटकऱ्यांची मनं –

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, “या रस्त्यावर वाहनाचा वेग ताशी २० ते ३० किमी प्रतितासापेक्षा जास्त असू शकत नाही, मात्र व्हिडीओतील बसचा वेग त्यापेक्षा जास्त असल्याचं दिसत आहे. पादचाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहूनच रस्ता ओलांडायला पाहिजे. आनंदाची बाब ही आही की कोणतीही दुर्घटना घडली नाही.” @DineshBjaj_ यांनी लिहिलं, “आज यमराज जी आज सुट्टीवर होते, त्यामुळेच महिलेचे प्राण वाचले.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “रॅश ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हरला शिक्षा झाली पाहिजे. या भागातील खाजगी बसचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.” मात्र काही नेटकरी ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळेच महिलेचा प्राण बचावल्याचं म्हणत आहेत.

Story img Loader