Shocking video: आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला आवडत असेल. किंबहूना समोसा हा पदार्थ देशभरात मोठ्या आवडीनं खाल्ला जातो. पण बाहेरील पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका, स्वच्छतेबाबत संशय असतोच पण सोबतच पदार्थ चविष्ठ करण्यासाठी काही वेळेस हानिकारक पदार्थ देखील त्यामध्ये वापरले जातात. समोसा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र आता आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुमच्या तोंडचं पाणी पळेल. हा धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. आता हेच प्रकरण पाहा ना चक्क पायानं समोशाचं पीठ एक व्यक्ती मळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पाहून तुम्हीही यापुढे समोसा खाण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

घरात किंवा ऑफिसमध्ये कुठल्याही छोट्या पार्टीत समोसे असणे ही एक कॉमन गोष्ट आहे. लहान मुले असोत किंवा म्हातारी, सगळेच मोठ्या आवडीने समोसे खातात. पण आता इथून पुढे समोसा खाताना तुम्हीही दहा वेळा विचार कराल. दिवसेंदिवस अन्नपदार्थांत भेसळीचं प्रमाण वाढत आहे. वडापाव, समोसा म्हटलं अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कमी किंमतीत पोटभरीचं खाणं म्हणजे वडापाव व समोसा. मात्र, खवय्यांच्या तोंडच पाणी पळवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत समोसा बनवताना वापरण्यात आलेली पद्धत बघून तुमच्या अंगावरही काटा येईल. एका दुकानात कारागीर पायाने सामोसे बनवण्यासाठीची बटाटे तुडवीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

होय, विश्वास बसत नाहिये? तर मग व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समोस्यामध्ये बटाट्याची भाजी असते, त्यासाठी लागणारे बटाटे हा कामगार अक्षरश:पायाने तुडवत आहे. यावेळी कुणीतरी याचा व्हिडीओ काढला, दरम्यान व्हिडीओ सुरु असल्याचं जेव्हा कामगाराला कळलं तेव्हा तो आक्रमक झाला आणि व्हिडीओ काढायला विरोध करु लागला.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ computergeeks91 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरीही यावर संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय, “अशा लोकांवर तातडीनं कारवाई करा”, तर आणखी एकानं “आता काय लोकांचा जीवच घेणार का?” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.

Story img Loader