सध्या सोशल मीडियावर अनेक पाळीव प्राण्यांचे मनोरंजक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओत कुत्रा आणि मांजरीच्या व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन मांजरींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओमधील दोन मांजर कोणत्याही संरक्षणाशिवाय बाईकवरून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मांजरींचा आपल्या मालकावर खूप विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळतात. आपल्या पाळीव प्राण्यांची ती खूप काळजी घेताता आणि त्यांना अनेक चांगल्या सवयी लावतात. ज्या सवयीमुळे हे प्राणी कोणत्याही संकटावर मात करु शकतात. सध्या अशाच दोन मांजरांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते भरधाव बाईकवरुन प्रवास करत असल्याचं दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, एक दुचाकीस्वार त्याच्या दोन पाळीव मांजरींना बाईकवरुन घेऊन जाताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मांजरी धावत्या बाईकवर कसलाही आधार न घेता खूप बिनधास्तपणे बसल्याचं दिसत आहेत.

हेही वाचा- ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला तो परतलाच नाही, कुत्र्याच्या भीतीने Swiggy बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

एक मांजर बाईक चालवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर असणाऱ्या पिशवीवर बसली आहे, तर दुसरी पेट्रोलच्या टाकीवर बसल्याचं दिसत आहे. या दोन्ही मांजरींकेड बघून त्यांना नियमित दुचाकीवरून प्रवास करण्याची सवय आहे असं वाटतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ बेंगळुरूचा असून @alwAYzgAMe420 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन तो शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा- Video : छोट्या कुत्र्याची मोठी खासियत! आनंद महिंद्रा यांचंही मन जिंकलं, म्हणाले, “एक दिवस स्टेज गाजवणार”

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘हा मुलगा आज आऊटर रिंग रोड (ORR) बंगळुरू येथे दिसला.’ हा १५ सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ६१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ‘याला म्हणतात विश्वास आणि प्रेम.’ तर अनेकांनी हे त्या मांजरींसाठी खूप धोकादायक ठरु शकते असं म्हटलं आहे मात्र, अनेक व्यक्तींनी हा व्हिडीओतील मांजर खूप गोंडस असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of a person riding two pet cats on a bike in bangalore has gone viral jap