वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या जग्वारचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलात राहणारे प्राणी सतत शिकारीच्या शोधात असतात, त्यामुळे त्यांना खूप सावधानतेने राहावं लागतं. चुकून जर त्यांनी निष्काळजीपणा केला किंवा आपल्या सुरशिततेबाबत सतर्क राहिले नाहीत तर त्यांना ते किती महागात पडू शकतं याचं उदाहरणं समोर आलं आहे. ज्यामध्ये जंगली प्राण्याचं जगणं किती कठीण असतं हे दिसून येत आहे.
खरं तर मगरीला पाण्यातील सर्वात शक्तिशाली आणि तितकाच धोकादायक प्राणी माणलं जातं. मगरीच्या ताकदीपुढे मोठा हत्तीदेखील पराभूत होतो. पण कधी कधी मगरीवरदेखील एखादा प्राणी जीवघेणा हल्ला करु शकतो. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, नदीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत एक मगर आरामात उन्हात बसल्याचं दिसत आहे. इतक्यात मागून एक जग्वार शांतपणे पोहत येतो आणि निवांत बसलेल्या मगरीवर पाठीमागून हल्ला करतो.
हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…
या दोघांमध्ये खूप वेळ संघर्ष सुरु असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मगर जग्वारच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते तरीही तीला जग्वारच्या तावडीतून सुटायला येत नाही. शेवटी तो मगरीची शिकार करतो. या शिकारीचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे.
हेही पाहा- आमदारांची तारांबळ अन् ट्विटरवर मिम्सचा पाऊस…, मुंबईतील मेघराजाची वेगवेगळी रुपं पाहिलीत का?
व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल –
हा भयानक व्हिडिओ एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 9 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी याला धक्कादायक म्हटले तर काही लोकांनी जग्वारची ताकद जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे.