आपल्या आजूबाजूच्या परिसरात माकडं इकडून तिकडे उडया मारताना आपल्याला सर्रास दिसतात. सध्याची माकडं इतकी हुशार आहेत की, ते माणसांची देखील नक्कल करतात. एवढंच नव्हे, तर ही माकडं माणसांना चकमा देण्यात देखील पटाईत असतात. मात्र, तुम्ही कधी माकडांना मोबाईल चालवताना पाहिलं आहे का? पाहिलं नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच. या व्हिडीओमध्ये चक्क एक माकड माणसाप्रमाणे बेडवर पडून मोबाईल चालवताना दिसत आहे. हे माकड युट्युबवर व्हिडीओ पाहण्यात मग्न असताना कॅमेरामनने या माकडाचा व्हिडीओ शूट केला आहे.

या काही सेकंदांच्या क्लिपमध्ये बेडवर पडून एक माकड मस्ती करत मोबाईल चालवताना दिसत आहे. या माकडाचा हा स्वॅग पाहून इंटरनेटचे लोक देखील हैराण झाले आहेत. खरंतर, बेडवर पडलेल्या या माकडाच्या हातात स्मार्टफोन असतो, ज्यामध्ये यूट्यूबवर एक व्हिडीओ चालू असतो. हे माकड मोबाईल बघण्यात एवढं व्यस्त असतं की, त्याला थोडा वेळ लक्षातच येत नाही की कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवत आहे. मात्र, काही सेकंदांनी माकड कॅमेरामनला पाहतो. हा व्हिडीओ काही वेळातच इतका व्हायरल झालाय, की लोकांनी आपल्या भावंडांना, मित्र-मैत्रिणींना टॅग करायला सुरुवात केली आहे.

( हे ही वाचा: VIRAL VIDEO: लग्नात नवरदेवाने केला नवरीच्या पायाला स्पर्श! नेटिझन्सने केले कौतुक)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ hersey.dahil16 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. यामुळेच या क्लिपला आतापर्यंत १३ लाख व्ह्यूज आणि ७७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक युजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी विचारले आहे की, तो काय पाहत आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, मी याआधी इतका अनोखा व्हिडीओ कधीच पाहिला नव्हता.

Story img Loader