सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. शिवाय कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला जंगलातील प्राण्यांशी संबंधित अनेक रहस्यमयी गोष्टी पाहायला मिळतात. तसेच अनेकदा अशी दुर्मिळ दृश्यही कॅमेऱ्यात कैद होतात, जी पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सापाने एका पक्ष्याची शिकार केल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये सापाने ज्या पद्धतीने पक्ष्याची शिकार केली आहे ते पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
खरं तर, सापांना अनेकजण घाबरतात, कारण साप पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानला जातो. अनेकदा विषारी सापाने दंश केल्याने माणसांचा आणि वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहात आणि वाचत असतो. जगभरात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यामध्ये काही साप त्यांची जाणूनबुजून खोड काढली किंवा आपल्याकडून चुकून त्यांना इजा केली तरच ते दंश करतात; तर काही साप आपल्या शिकारीच्या शोधात तासनतास एकाच जागी बसून राहतात.
सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये असाच साप दिसत आहे, जो एका पक्ष्याची शिकार करण्यासाठी डोंगराळ भागात एका खडकात लपल्याचं दिसत आहे. यावेळी तो खूप संयमाने शिकारीची वाट पाहतो आणि अचानक, विजेच्या वेगाने तो एका पक्ष्यावर हल्ला करतो. ही सर्व थरारक आणि आश्चर्यचकित करणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सापाच्या या सामर्थ्याचे हे प्रदर्शन पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
सापाने पक्ष्याची शिकार केल्याचा हा व्हिडीओ snake.chanel01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो नेटकरी मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “प्राण्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे.” तर अनेकांनी हा व्हिडीओ निसर्गाच्या आणि जंगली प्राण्यांच्या क्रूर आणि भयानक वास्तवाचे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.