सोशल मीडियावर प्राण्यांशी आणि पक्ष्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला थक्क करणारे असतात तर काही आपलं मनोरंजन करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या महिलेच्या प्लेटमधील पास्ता चिमणी खाल्ल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, चिमणी सहसा माणसांच्या जवळ यायला घाबरते, मात्र तिने चक्क महिलेच्या प्लेटमध्ये जाऊन पास्ता खाल्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय व्हिडीओतील महिलेनेदेखील या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
चिमणीने महिलेच्या प्लेटमधील पास्ता खाल्ल्याचा व्हिडिओ@Bornakang नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता जो आतापर्यंत ४१ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओमध्ये, एक महिला रेस्टॉरंटमध्ये पास्ताची प्लेट घेऊन बसलेली दिसत आहे. यावेळी ती अचानक आश्चर्यचकीत होते, कारण यावेळी तिच्या प्लेटच्या काठावर एक चिमणी येऊन बसल्याचं दिसत आहे.
हेही वाचा- जबरदस्त क्रिएटीव्हीटी! कर्मचाऱ्याचा अनोखा राजीनामा, हटके अंदाजात कंपनीला रामराम ठोकला
यावेळी ती चिमणी महिलेच्या प्लेटमधील पास्ता खायला सुरुवात करते. यावेळी आसपास असणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काळजीपूर्वक आणि संयमाने महिलेच्या ताटातील इटालियन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. काही वेळानंतर ती चिमणी सुरक्षित अंतरावर उडून जातो. मात्र ती पुन्हा मागे दुसऱ्या महिलेच्या प्लेटमधील खाद्यपदार्थ खातानाचा स्क्रीनशॉटही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करण्यात आला आहे.
चिमणीच्या या कृतीला उत्तर देताना ती महिलेने म्हटलं आहे, “मी चिमणीला दोषही देत नाही, कारण ती उपाशी असेल. अरे देवा.” तर चिमणी निघून गेल्यानंतर ती महिला पुन्हा पास्ता खायला सुरुवात करते. या चिमणीचा मजेशीर व्हिडीओ सुरुवातीला TikTok वर शेअर करण्यात आला होता. तिथेही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर तो ट्विटरवर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ २४ जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये असे लिहिले होते, “अरे हे रेकॉर्ड केले नसते तर कोणीही यावर विश्वास ठेवला नसता.” तर अनेक नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.