Viral Video : नोकरी करणार्‍यांसाठी पगाराचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. सर्व जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात कारण याच पगारावर महिन्याच्या खर्चाचे नियोजन अवलंबून असते. एक दिवस जरी पगार उशीरा झाला तर जीव कासावीस होतो पण पगार वेळेत मिळाला की आनंद गगनात मावेनासा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पगार झाल्यानंतर आपण कसं आनंदी होतो, हे गाणं गात सांगतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (when your salary credit a young man sings funny song from panchayat web series video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण हातात गिटार घेऊन उभा दिसेल. या तरुणाच्या आजुबाजूला अनेक तरुण मंडळी उभे आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण म्हणतो, “जेव्हा पगार येतो तेव्हा माणूस काय म्हणतो? आणि त्यानंतर तो लगेच एक गाणं गाताना दिसतो. तो गिटारच्या तालाबरोबर गातो, “ऐ राजा जी ऐ राजा जी ऐ राजा जी एकरे ता रहल हा ज़रूरी महूरत खूबसूरत हो..” त्याच्याबरोबर इतर शेजारी उभे असलेले तरुण मुले सुद्धा गाताना दिसतात. हे गाणं पंचायत या लोकप्रिय वेबसीरीजमधील आहे. तरुणाचं गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ साडेचार लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

हेही वाचा : CCTV installs on Daughters Head: पाकिस्तानमध्ये मुलीच्या सुरक्षेची बापाला चिंता; थेट डोक्यावरच बसवला सीसीटीव्ही कॅमेरा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : लालबागला जाताय? VIP लाईनमध्येच हे हाल तर सर्वसामान्यांचं काय; दर्शनाला जाण्याआधी ‘हा’ VIDEO नक्की बघा

shikhar_singh_live_music या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सॅलरी क्रेडिट सॉन्ग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ते पण गाणं ऐकवा जेव्हा पगार जातो” तर एका युजरने लिहिलेय, “मग नाही तर काय, त्याच दिवसाची वाट पाहत असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “पगार येतो आणि लगेच संपतो, त्यावरही एक गाणं असायला पाहिजे” एक युजर लिहितो, “या गाण्याचा अर्थ मला आज समजला” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी तर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.