सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी प्रवाशांनी एकमेकांशी केलेल्या भांडतानाचे तर कधी एखाद्या अफवेमुळे प्रवाशांच्या गोंधळाच्या व्हिडीओंचा समावेश असतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका विमानातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती गुपचूप तंबाखू खाताना दिसत आहे. चालत्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये अशा प्रकारे तबांखू खातानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु या व्यक्तीने चक्क विमानात तंबाखू खाल्यामुळे नेटकरी व्हिडीओवर मजेदार कमेंट करत आहेत.
विमानात तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीचा VIDEO व्हायरल –
देशी अंदाजात कुठेही तंबाखू खाणाऱ्या लोकांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ते कुठेही तंबाखू खाताना दिसतात. तर काही लोक तर तंबाखू खातानाचे रील देखील बनवतात. महत्वाची बाब म्हणजे नेटकरीही अशा रील्स पाहणं पसंद करतात. असाच हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, जो नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडीओमध्ये विमानातून प्रवास करणारा एक वयस्कर व्यक्ती तंबाखू खात असल्याचं दिसत आहे. तंबाखू खाऊन झाल्यावर तो चेहऱ्याला मास्कही लावताना दिसत आहे. शिवाय यावेळी विमानातील सर्व सीटवर प्रवासी बसल्याचंही पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रीया –
विमानात तंबाखू खाणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ही व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला ही खूप आनंदाची बाब आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, कृपया खिडकीच्या कोपऱ्यात थुंका. तर तिसऱ्या एकाने लिहिले की, ‘हातात सोन्याची वाटी द्या, तरीही हे लोक भीक मागतील. तर एका नेटकऱ्याने आम्हाला पण थोडी तंबाखू द्या असं म्हटलं आहे. मात्र, काहीने टकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.