Elephant Dancing Video :सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. एखादा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर क्षणार्धात लाखो लोकापर्यंत पोहचू शकतो. पण अनेकदा त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट सत्य असतेच असे नाही. अनेकदा वस्तुस्थिती न पडताळताच लोक व्हिडिओ पोस्ट करतात आणि अनेक लोक डोळ्यावर पट्टी बांधून त्यावर विश्वास ठेवतात आणि इतरांबरोबर शेअर करतात. यामुळे चुकीची माहिती किंवा अफवा पसरल्या जातात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे ज्यामध्ये एक हत्ती नाचत असल्याचा दावा केला आहे.
लोकांच्या गर्दीत ‘इल्युमिनाटी’ या गाण्यावर नाचणाऱ्या ‘हत्ती’चा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे . व्हिडीओमध्ये दिसते की, गाण्याच्या तालावर एक हत्ती अचूकपणे नाचताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकाना प्रश्न पडला आहे हे कसे शक्य आहे. पण हे सत्य नाही. या व्हिडीओमागील सत्य काय आहे ते जाणून घेऊ या.
एक्स युजर अंकिता यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, “भारतात सर्वकाही शक्य आहे.” हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अल्पावधतीत तुफान व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका उत्सवामध्ये अनेक लोक रस्त्यावर इल्युमिनाटी गाण्यावर नाचताना दिसत आहे. दरम्यान त्या गर्दीमध्ये एक हत्ती असल्याचे दिसते जो गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. एवढेच नाही तर हत्ती पाय उचलून थिरकतो आहे. जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण तो खराखुरा हत्ती नव्हे तर भव्य हत्तीच्या पोशाख आहे जो परिधान करून लोक नाचत आहे. हा पोशाख अशा पद्धतीने परिधान केला जातो जेणेकरून लोकांना खरा हत्ती असल्याचा आभास होईल. संगीत वाजत असताना आणि गर्दी बरोबर हा पोशाखातील हत्ती देखील नाचत आहे. ‘हत्ती’ त्याचे डोके आणि सोंड हलवत असल्याचे दिसून आले.
आत लपलेल्या कलाकारांच्या गटाने जिवंत केलेल्या या पोशाखातील हत्तीचे नृत्य नेटकऱ्यांना प्रचंड आवडले. पण अनेक प्रेक्षकांना असे वाटले की व्हिडिओमध्ये तो खरोखरच खरा हत्ती आहे, त्यानंतर एका वापरकर्त्याने स्पष्टीकरण दिले: “काळजीपूर्वक पहा. हा एक खोटा हत्ती आहे. आत दोन पुरुष आहेत).”
वापरकर्त्याला उत्तर देताना अंकिताने पुष्टी केली: “हो, मला माहित आहे.”
अनेकांनी कमेंट करत म्हटले की,”हा भारत देश आहे येथे काहीह शक्य होऊ शकते जुगाडपासून इल्युमिनाटीपर्यंत सर्वकाही.” तर काहींनी हत्तीच्या
नृत्याचे कौतुक केले. एकाने कमेंट केली की, वा, किती सुंदर नृत्य केले आहे हत्तीने.
व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
शेवटी तात्पर्य इतकेच सोशल मीडियावर कोणताही चुकीची माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट करू नये.