अनेकवेळा आपण जात असलेल्या रस्त्यावर काहीतरी कामं सुरु असतं. यामध्ये कधी पाण्याच्या पाईपची दुरुस्ती किंवा रस्त्याची दुरुस्ती सुरु असते. मोठ्या शहरांमध्ये अशी कामं झटपट पुर्ण करता यावी म्हणून जेसीबीच्या साह्याने ती कामे केली जातात. सध्या अशाच एका रस्त्यावर काम करत असलेल्या जेसीबाचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर आपण जेसीबीबाबतचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहिले आहेत. मागील काही दिवसांपुर्वी जेसीबीच्या खोदकामाचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरु होता. त्यामुळे सोशल मीडियावरील जेसीबीबाबतचा कोणताही व्हिडीओ बघण्याचं नेटकरी टाळत नाहीत. अशातच आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो तर जेसीबी चालकाच्या अप्रतिम अशा कौशल्याचा नमुना असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- Video: दाट धुक्यातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या चालकाने केबिनमधून दाखवलेला अद्भुत नजारा पाहाच

व्हायरल होत असेलेला जेसीबीच्या व्हिडीओमध्ये एक कार चालक जेसीबीच्या खालून आपली कार नेताना दिसत आहे. जे दृश्य खूप धक्कादायक आहे. शिवाय कार चालकासाठीही असं धाडस करणं खूप धोकादायक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. पण जेसीबी चालकाच्या हुशारीमुळे ही कार सुरक्षितपणे जेसेबी खालून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

जेसीबीने कारसाठी केला रस्ता –

इंस्टाग्रामवर हा आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये ‘धोक्याशी खेणारा खरा खेळाडू’ असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये एक जेसीबी दिसत आहे, जो रस्त्याच्या कडेला खोदकाम करत आहे. त्याचवेळी एक कार तिथे येते त्यावेळी या कारला रस्ता देण्यासाठी जेसीबीचालक आहे त्याच ठीकाणी जेसीबी उचलतो ते दृश्य अत्यंत धोकादायक वाटत आहे.

हेही पाहा- Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, अंगावर इतके कपडे घातले की मोजणाराही थक्क झाला

मात्र, कारचालक आपली कार जेसीबीच्या खालून सुखरुपपणे बाहेर नेताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओची तुलना इंटरनेटवरील इतर धोकादायक स्टंटच्या व्हिडिओंशी करायला सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेक वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. . एका वापरकर्त्याने ही ‘ऑटोमोटिव्हची कमाल असून ऑटोमोटिव्ह अभियंता असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ‘ही टेक्नॉलॉजी देशाच्या बाहेर जाउऊ देवू नका’ अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of jcb hanging in the air to cross a car on the road is going viral jap
Show comments