Breathtaking Lightning Volcanic Eruption At Himachal Bijli Mahasev Temple : लाइटहाऊस जर्नलिझमला वीज पडतानाचा एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावरील वापरकर्ते दावा करत आहेत की, हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील एका शिव मंदिराचा आहे, जिथे १२ वर्षांतून एकदा वीज पडते. या मंदिरावर वीज पडल्याने मोठे नुकसान झाल्याचा दावाही या व्हिडीओतून करण्यात आला आहे. पण, खरंच हा व्हिडीओ हिमाचलमधील मंदिरातील आहे, याविषयी नेमके सत्य काय आपण जाणून घेऊ…

.

Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
fire broke out Bavdhan area, Bavdhan area fire,
पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक
Ghateshwar Shiv Temple shindewadi
पुण्यापासून फक्त ५० किमीवर आहे सुंदर तलावाच्या काठी हे शिवमंदिर, VIDEO एकदा पाहाच
earthquake gadchiroli
तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…
Strong Earthquake Near Maharashtra Telangana Border
Maharashtra Telangana Earthquake : महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
do you see a beautiful hanuman temple in pune
Pune Video : पुण्यातील श्री हनुमानाचे हे सुंदर मंदिर तुम्ही पाहिले का? व्हिडीओ होतोय व्हायरल

काय होत आहे व्हायरल?

X युजर Vikash Mohta ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

इतर वापरकर्ते अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला गूगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये ‘व्होल्कन डी फुएगो’ असे प्रॉम्प्ट मिळाले.

आम्हाला तोच व्हिडीओ reddit.com वर पोस्ट केलेला आढळला. व्हिडीओचे शीर्षक होते: Lightning striking directly into the Mont Fuego volcano’s crater. Nature is truly amazing!

आम्हाला 9gag.com वर अपलोड केलेल्या पोस्टवर लोकांच्या ऑडिओसह एक व्हिडीओदेखील सापडला.

https://9gag.com/gag/amo9jyv

व्हिडीओचे शीर्षक होते: Volcanic Storm happening at the Fuego volcano in Antigua Guatemala during an eruption.

त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड शोध घेतला आणि त्याबद्दलच्या बातम्यांचे रिपोर्ट्स तपासले.

आम्हाला या भयंकर घटनेबद्दल अनेक रिपोर्ट्स सापडले.

https://www.foxweather.com/extreme-weather/erupting-volcano-lightning-guatemala

रिपोर्टमध्ये, मे २०२४ मध्ये हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे नमूद होते.

एका बातमीने नमूद केले आहे, गेल्या महिन्यात ग्वाटेमालामधील ज्वालामुखीचा उद्रेक पाहणाऱ्या निरीक्षकांना अनपेक्षितपणे आणि आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले, ज्यात ज्वालामुखीवर वीज पडताना दिसतेय. या घटनेचा व्हिडीओ या आठवड्यात ऑनलाइन व्हायरल होत आहे, ज्यात एका कॅप्शनसह पोस्ट करत लिहिण्यात आले आहे की, “हे शक्य आहे का?”, पण भौतिकशास्त्राच्या सिद्धातांनुसार, कोणत्याही उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीमध्ये स्वतःची वीज निर्माण करण्याची क्षमता असते.

https://www.smithsonianmag.com/smart-news/lightning-dazzles-onlookers-watching-the-eruption-of-volcan-de-fuego-in-guatemala-180984367/

यापूर्वीही असे व्हिडीओ टिपण्यात आले होते.

https://www.newsweek.com/volcanic-lightning-captured-incredibly-rare-footage-1778511

त्यानंतर आम्ही बिजली महादेव मंदिराविषयीचे अहवाल तपासले. यावेळी आम्हाला मंदिराबाबत अनेक अहवाल मिळाले.

https://navbharattimes.indiatimes.com/travel/religious-trip/facts-about-bijli-mahadev-temple-in-kullu-himachal-pradesh/articleshow/94222366.cms

आम्हाला असे आढळले की, हे मंदिर हिमाचल प्रदेशात अस्तित्वात आहे; जेथे मंदिरावर वीज पडते असे दावे केले जातात. आम्हाला मंदिराला समर्पित एक फेसबुक पेजदेखील सापडले आहे, तथापि पेजवरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेल्या व्हिडीओसारखा नाही.

ट्रिब्यूनच्या यूट्यूब चॅनेलवर तीन वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडीओही आम्हाला आढळला. व्हिडीओचे शीर्षक होते: हिमाचलच्या कुल्लू येथील बिजली महादेव मंदिरावर वीज कोसळली.

निष्कर्ष : ग्वाटेमालामधील Volcán de Fuego येथील वीज पडण्याचा व्हिडीओ भारतातील असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. मात्र, हे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader