तुम्हाला रोज सकाळी चहासोबत ब्रेड खायला आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण ब्रेड बनवणाऱ्या एका दुकानातील जुने ब्रेड ताजे दिसावे यासाठी ब्रेडवर रंग फवारतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही.
जगभरात असे काही लोक असतात जे काही पैशांसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये दुकानदार खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करतात. जे ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. या आधाही आपण भाजी विक्रेत्यांना वांग्यांसह अनेक भाज्यांवर रंग फवारताना किंवा खराब पाण्यामध्ये भाज्या धुताना पाहिले आहेत. अशातच आता ब्रेडवर रंग फवारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता तुम्हीही ब्रेड खाताना विचार कराल यात शंका नाही.
हेही पाहा- Viral News : ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेची फसवणूक, १२ हजारांचा टूथ ब्रश मागवला आणि…
ब्रेडवर पेंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल –
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एका दुकानात दोन व्यक्ती शिळे ब्रेड ताजे दिसावे यासाठी त्यावर रंग फवारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठिण झालं आहे. आजकाल अनेक लोक मोठ्या संख्येने ब्रेडचे सेवन करतात. अनेकजण ऑफिसला जाताना किंवा घरात झटपट नाश्त्यासाठी ब्रेड खातात त्यामुळे ही नक्कीच काळजी वाढवणारी घटना असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
हेही वाचा- पूर्वी एक किलो सोने ‘इतक्या’ रुपयांत; १९५९ सालचे व्हायरल होत असलेले बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हिडिओ व्हायरल –
लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ संध्या बाबू नालाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर तो २३ लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. पण हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि त्यातील घटना कितपत खरी आहे याबाबती माहिती समोर आलेली नाही.