तंत्रज्ञानामुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. पण कधीकधी किरकोळ चुकांमुळे हे तंत्रज्ञान आपल्यासाठी डोकेदुखी ठरु शकते याचे उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ. हो कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर कारमध्ये अडकलेल्या दोन महिला दिसत आहेत. ज्या दारूच्या नशेत गाडी चालवत होत्या आणि जीपीएसला फॉलो करत होत्या. शिवाय जीपीएसने दाखवलेल्या मार्गाने जाण्याच्या नादात त्या थेट समुद्रात पोहोचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही संपुर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठिण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने शूट केला आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक समुद्रात उडी मारुन कारमधील महिलांना वाचवताना दिसत आहेत. या दोन्ही महिला समुद्रात अर्ध्या बुडालेल्या कारमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र, कार समुद्रात बुडाली असल्यामुळे त्या महिला इतर लोकांच्या मदतीची वाट पाहात असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- धावपट्टीवरील विमानाने अचानक पेट घेतला अन्…, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रवाशांचा Video व्हायरल

जायचे होते जपानला पोहोचल्या चीनला…

हेही पाहा- गौतमी पाटीलचा नाच सुरु झाला आणि पत्र्याची शेड कोसळली, वैजापूरमधली घटना

मीडिया रिपोर्टिंगनुसार, दोन महिला पर्यटक जीपीएसच्या मदतीने रस्ता शोधत कार चासवत असताना त्यांनी आपली कार थेट समुद्राकडे वळवली आणि ती कार पाण्यात गेली. स्थानिक लोकांनी या दोन महिला पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला पर्यटक टूर कंपनी शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी चुकीचे वळण घेतले आणि त्यांची कार थेट समुद्रात गेली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल-

या घटनेचा व्हिडीओ thehutchess नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मजेशीर असल्यामुळे अनेकजण तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, “मी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होतो इतक्यात बंदरात एक कार आली आणि आमच्या बोटीच्या पुढे जाताना दिसली.” दरम्यान, या व्हिडीओवर अनेक नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.