Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. कोणत्याही शुभ प्रसंगी, विशेषत: लग्न समारंभात उखाणा घेण्याची प्रथा आहे. नव्या जोडप्याला आवडीने उखाणा विचारला जातो. पूर्वी फक्त महिला उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेत जोडीदाराचे नाव घेतात.
सध्या लग्नसराई सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नातील अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक नववधू उखाणा घेताना दिसते. नवरी उखाणा घेत लव्ह स्टोरी सांगते. हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Heartwarming Video : Bride reveals her beautiful love story through a traditional Ukhaana ritual)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरी नवरदेव बसलेले दिसेल. त्यांच्या आजुबाजूला नातेवाईक बसलेले आहेत. या वेळी नवरी उखाणा घेते, “जीवनसाथी डॉट कॉम वर झाली आमची भेट
पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले थेट
लग्न नाही करायचं ठरवलं तरी मैत्री जपू आयुष्यभर असा मनी धरला ध्यास
पण याच मैत्रीच्या प्रवासात एकमेकांना वाटू लागलो खास
मग काय.. भेटीगाठी वाढल्या.. लंच आणि डिनर डेट, यातच अनंत ने लग्नासाठी प्रपोज केलं थेट
दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा
१२ डिसेंबर मुहुर्त ठरला आमच्या लग्नाचा
हो हो उखाणा म्हणत म्हणत कहाणी झाली सांगून
आता घेतेय त्याचं नाव ऐका कान धरून
उखाणा घ्या उखाणा घ्या आग्रह करतात सर्व जण त्यामुळे उखाणा घेते आता घाई घाई..
आजपासून अनंतराव माझे.. ऐकताय ना सासूबाई…”

हेही वाचा : “हे कोल्हापूर आहे, येथे पैशाला किंमत नाही, पण…” कोल्हापूरचे ऑटोचालक काका लाख मोलाची गोष्ट बोलून गेले, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

dr.kalyanijoshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “Lovestory उखाणा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी लिहिलेय, “खूप छान” तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी उखाण्याचे असे भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. उखाण्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात.