Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे नवरा बायको एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाही किंवा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करू शकत नाही पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी काळजी व प्रेम कायम असतं.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात पत्नी पतीला अचानक फोन लावते आणि पतीविषयी प्रेम व्यक्त करते. त्यावेळी पती मजेशीर प्रतिक्रिया देतो. पती पत्नीमधील गोड संवाद तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका महिलेला स्टेजवर बोलावतो आणि पतीला फोन लावून प्रेम व्यक्त करण्यास सांगतो. तेव्हा महिला फोन स्पीकर वर ठेवून नवऱ्याशी संवाद साधते
पत्नी – हॅलो
पती – हा बोल
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – काय
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – झालं की…
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – झालं की…किती वेळा म्हणायचं.
पत्नी – उत्तर द्या ना..
पती – हो माझं पण प्रेम आहे
नवरा बायकोचा हा गोड संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या जोडप्याची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” अचानक केला नवऱ्याला कॉल…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्या नवऱ्याने तर लगेच कॉल कट केला असता. म्हटले असते चुकीचा नंबर असेल उगाच रिस्क कशाला घ्यायची.” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान हो ताई असंच गोड आनंदी राहा” आणखी एका युजरने लिहिलेय, “वहिनी घाबरल्या होत्या पण रिप्लाय काय येतो आणि काय नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.