व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं आहे. शिवाय व्यसन केल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो हे देखील अनेकांना माहिती असतं तरीही लोक व्यसन करणं बंद करत नाहीत. त्यांची सवय काही केल्या जात नाही. शिवाय घरातील कर्ता पुरुष जर व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्या घरातील स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो, म्हणूनच अशा स्त्रिया आपल्या नवऱ्याचं व्यसन सुटावं यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि हसू देखील येईल.
हो शिवाय आपल्या नवऱ्याचे व्यसन कसे सोडवायचे आणि व्यसनापासून मुक्ती कशी मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. खरतंर आपला पती नशेत आहे हे कळल्यानंतर या व्हिडीओतील महिलेने असं काही केलं की नवऱ्याची नशा उतरलीच मात्र त्याला जन्माची अद्दलही या महिलेने घडवली आहे.
व्हायरल होत असलेला हा नवरा-बायकोचा व्हिडीओ El Chiki नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये स्पॅनिशमध्ये लिहिलं आहे की, ‘व्यसनमुक्तीसाठीचा उपाय’ व्हिडिओमध्ये कथित पती-पत्नी पाण्यात आहेत. ज्यामध्ये नवरा पाण्यात बसल्याचं दिसत आहे. तर त्याची पत्नी त्याच्या डोक्यावर काही पाने मारत असल्याचं दिसत आहे.
हेही पाह- Video: दारुच्या नशेत रिक्षाचालकाने समोर येईल त्या वाहनाला दिली धडक, पोलिसांसमोर घडली धक्कादायक घटना
पाने मारुन झाल्यावर ती आपल्या पतीला दोन्ही हातांनी पाण्यात बुडवताना दिसतं आहे. शिवाय नवऱ्याचा श्वास गुदमरला तरीही ती त्याला पुन्हा पुन्हा त्याचं डोकं बुडवताना दिसत आहे. त्यामुळे एवढ्या खतरनाक पद्धतीने पत्नी पतीची नशेतून सुटका करून घेत असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. शिवाय या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्या व्हिडीओवर गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर व्हिडीओतील नवरा व्यसन करण्याआधी अनेकदा करेल यात शंका नाही.