सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांमध्ये फसवणूक आणि पेपरफुटीच्या घटना सर्रास घडल्या आहेत. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होत आहेत आणि सरकारच्या कडक इशाऱ्यांनंतरही परीक्षांमधील कॉपीचा प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने परीक्षेत कॉपी करताना असे काम केले की, जेणेकरून तो पकडला जाऊ नये, परंतु असे असतानाही तो पकडला गेला.
IPS अधिकाऱ्यांनी शेअर केला व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ आईपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले की ” उत्तर प्रदेशमधील मेन सब-इन्स्पेक्टरच्या परीक्षेत चीटिंग.” व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून त्याचा डोक्यावरून विग काढत आहेत. त्याच्याआतमध्ये त्याने कॉपी करण्यासाठीच समान लपवलं होतं. ज्याला पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने पकडलं. व्यक्तीने त्याच्या दोन्ही कानात छोटे इअरफोन लावले होते जे सहज बघू शकत नाही.
(हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)
(हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)
त्या व्यक्तीने कॉपीसाठी किती प्रयत्न केला पण तरी पकडला गेला. कारण कॉपी करण ही चुकीची गोष्ट आहे जी लपवता येत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्स यावर बऱ्याच कमेंट्सही करत आहेत.