Viral Video : ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला. या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळाले पण काही ठिकाणी त्यांना अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. या दरम्यान सोशल मीडियावर नेत्यांचे काही जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या तेजस्वी यादव यांचा असाच एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेने तेजस्वी यादवला असे काही मागितले की तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Viral News IN Marathi)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तेजस्वी यादव हे निवडणुक प्रचारचे भाषण संपवून गाडी कडे जात होते. अचानक त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. या गर्दीमध्ये एका महिलेने त्यांना आवाज दिला आणि त्यांनी निवडणुक जिंकावी म्हणून आशीर्वाद दिला. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की महिला तेजस्वी यादवला असे काही मागते की पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. ती तेजस्वी यादवला किस मागताना दिसते. त्यानंतर तेजस्वी यादवबरोबर असलेले लोक महिलेला म्हणतात, तुम्ही त्यांच्या हाताला किस करा तेव्हा महिला त्यांच्या हाताला किस करते आणि त्यांना १००० रुपये मागते. त्यानंतर तेजस्वी यादव हसतात आणि तिथून निघून जातात. हा व्हिडीओ जुना आहे जो पुन्हा व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला दिसत नाही पण आवाजावरून ही महिला वृद्ध असल्याची दिसून येते.

हेही वाचा : Video :”देवरुपी मोदींची फसवणूक” निवडणुकीच्या निकालावरुन भाजपा समर्थकाचा संताप; रागाने टीव्ही टाकला फोडून

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “हॅलो बाबा पीएसआय गोकुळ देशमुख बोलतोय” निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा वडिलांना केला फोन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया

bihar_notification_wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भरदिवसा महिला पेन्शन मागत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भिक मागण्याची पद्धत जरा वेगळी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीबाईचा आत्मविश्वास पाहिला का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी महिलेला पैसे न दिल्यामुळे तेजस्वी यादव यांच्यावर टिका केली आहे तर काही युजर्सनी निडणुक प्रचारादरम्यान महिलेला पैसे न दिल्याबद्दल व त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल कौतुकही केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman asked to tejaswi yadav for a kiss and then demanded for money old video goes viral on social media ndj