‘हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा’ असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. स्वर्गसुख ज्याला म्हणतात ते म्हणजे रायगड…होय. आयुष्यात एकदा तरी रायगडवारी करावी. जमलंच तर रायगडाचा किल्ला डोंगराच्या पायथ्यापासून चालत सर करावा. रायगड किल्ला डोळ्यांनी पाहणे म्हणजे सुवर्णपर्वणीच होय. शिवरायांचा शिवराज्यभिषेक याच ठिकाणी झाला, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर एकदा नक्की भेट द्यावी.
दरम्यान सध्या रायगडाच्या पायथ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रायगडाच्या पायथ्याशी आलेल्या एका महिलेचा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल.. थोर तुझे उपकार रायगडा…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रायगड पाहण्यासाठी रोज अनेक पर्यटक किल्ल्यावर येत असतात. या पर्यटकांवरच रागडाच्या पायथ्याला असणाऱ्या स्थानिकांचं पोट भरतं. पर्यटकांना पाणी सुका खाऊ यांसारख्या गोष्टींची ते विक्री करतात आणि यावरच त्यांचा उदर्निर्वाह होतो. अशीच एक महिला जी दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी रायगडावर कष्ट करते. त्या महिलेनं रायगडाच्या या उपकारांचे आभार मानले आहेत. या महिलेनं केलेल्या कृतीचं जगभरात कौतुक होतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला दिवस मावळताना रायगडावरुन उतरत असते, यावेळी ती जाताना रायगडावरील पायऱ्यांवर नतमस्तक होते. रायगडाचे आभार मानते. या महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
काय ती निष्ठा! दिवसभर अफाट कष्ट केल्यानंतर आपल्या पोटाची खळगी भरणारा तो रायगड. परतीच्या वेळी संध्याकाळी गड उतार झाल्यावर त्या पायरीच्या पाया पडताना ही माऊली..थोर तुझे उपकार रायगडा..असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! वृद्ध व्यक्ती चक्क सापाच्या तोंडाला चावला; पुढच्याच क्षणी झालं असं की…थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ होतं. पण ब्रिटीश लोक याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. साधारणतः ५०० वर्षांपूर्वी जेव्हा त्याला रायगडाचं रूप नव्हतं. त्यावेळी तो नुसताच डोंगर होता. तेव्हा त्याला ‘रासिवटा’ आणि ‘तणस’ अशी दोन नावं होती. निजामशाहीत रायगडाचा उपयोग फक्त कैदी ठेवण्यासाठी करण्यात येत असे. पुढे महाराजांनी रायगडास वेढा दिला आणि रायगड स्वराज्यामध्ये आला.