Video Viral : सध्या आषाढी वारी सुरू आहे. वारकरी व विठ्ठलाचे भक्त पायी पंढरपूरच्या दिशने निघाले आहेत.अशात वारीतील व्हिडीओ आणि विठ्ठलाचे जुने आणि नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या वारीनिमित्त विठ्ठलाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक वारीमध्ये भजन किर्तन करताना दिसत आहे तर कोणी नृत्य सादर करत आहे. कोणी आनंदाने फुगडी खेळताना दिसत आहे तर कोणी सेवा करताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जुना आहे पण आता पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर धाय मोकलून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. तुम्ही आजवर अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ नि:शब्द करणारा आहे. (a woman cried in front of vithhal, video viral)

विठ्ठलासमोर धाय मोकलून रडली महिला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला विठ्ठलाच्या समोर हात जोडून रडताना दिसत आहे. ती विठ्ठलाला तिच्या वेदना सांगताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला तिचे दु:ख जाणवेल. ती विठ्ठलाकडे मदत मागत आहे. या महिलेचे अश्रु थांबत नाही धाय मोकलून ती विठू माऊलीसमोर रडते. या व्हिडीओवर लिहिलेय, “हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा, अंगावर काटा येणार” व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

Video Pune man jumps into waterfall goes missing after being swept away
‘तो वाहून गेला अन् लोक बघत राहिले’, पुण्यातील तरुणाने धबधब्यात मारली उडी, थरारक घटनेचा Video Viral
Ram jhoola,Rsihikesh a women was beating a man, because he had a fight with her husband video viral
VIDEO: “अशी बायको प्रत्येकाला मिळो” ऋषिकेशला फिरायला गेलेल्या जोडप्यासोबत गैरप्रकार; महिलेनं काय केलं पाहाच
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Water Increased Many People Drowing In Water Scary Video Viral
मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…

हेही वाचा : लाइव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या हातावर कुत्र्याने घेतली झडप; पुढे जे घडले ते पाहून आवरणार नाही हसू ; पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

warkari_pandharicha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडिओ कधीच जुना नाही होणार.या माऊलीची वेदना व्हिडिओमधून समोर आणण्याचे खरे श्रेय”

हेही वाचा : कमाल! पठ्ठ्याने एका मिनिटात फोडले चक्क ‘एवढे’ अक्रोड; VIDEO पाहून व्हाल थक्क; गिनीज रेकॉर्ड्सनेही घेतली दखल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे ह्या माऊलीचा मुलगा हरवला होता तो सापडला” तर एका युजरने लिहिलेय,”हे देवा, यांची समस्या ऐकून घे” आणखी एका युजरने लिहिलेय, “श्री हरीचे सर्वांकड़े लक्ष असते. सर्वांना सुखी ठेवतो… जय हरी विठ्ठल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.