Viral Video : सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क कुत्रा स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

कुत्रा आणि माणसाचे अनोखे नाते आहे. त्यांच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. कुत्र्याला माणसाचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. अशाच एका महिलेचे तिच्या कुत्र्याबरोबरचे अनोखे नाते सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या व्हायरल व्हिडीओत कुत्रा त्याचा मालकिणीबरोबर चक्क स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Shocking Biker Accident: Overtaking Car at High Speed Leads to Tragedy
Accident Video : लोक का ओव्हरटेक करतात? कारला ओव्हरटेक करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ रोमानिया देशातील Romania Got Talent या कार्यक्रमातील आहे. Romania Got Talent हा एक टिव्हीवरील कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात एका महिलेने सहभाग घेतला होता. या महिलेने तिच्या कुत्र्याबरोबर सुंदर डान्स केला. ए आर रेहमानच्या गाण्यावर ही महिला तिच्या बरोबर सुंदर डान्स करताना दिसते. कुत्र्याच्या डान्स स्टेप्स पाहून तु्म्हीही चकीत व्हाल. मालकिणीबरोबर समन्वय साधत कुत्रा खूप सुंदर डान्स करताना दिसतो. ए आर रेहमानच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या महिलेचे नाव अनास्तासिया ब्यूमॉन्ट असून तिच्या anastasiia_beaumont या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रोमानिया गॉट टॅलेंट शोमध्ये आम्ही डान्स केला. आम्हाला सर्व प्रशिक्षक “होय” म्हणाले. तुम्हाला तुमच्या कुत्र्याला डान्स शिकवायचा असेल तर माझा ऑनलाइन क्लास करू शकता.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स केला आहे.” तर एका भारतीय युजरने लिहिलेय, “भारताकडून प्रेम” आणखी एका युजरने लिहिलेय, “जय हो” या व्हिडीओवर अनेक भारतीय युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारतीयांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.