अजमेरच्या, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला कानात ईअरफोन लावून डान्स करताना दिसत आहे. महिलेच्या या डान्समुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महिलेचे हे कृत्य म्हणजे दर्ग्याच्या वैभवाचा अपमान असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. शिवाय हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
दर्ग्यात महिला नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल –
व्हिडीओमध्ये एक महिला दर्गा परिसरातील झालरा दालनात कानात ईअरफोन लावून उभी असल्याचं दिसत आहे. शिवाय यावेळी ती गाणे ऐकत नाचताना दिसत आहे. दर्गा कमिटीने इथे अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, जे असे व्हिडीओ काढण्यापासून लोकांना रोखतात, पण या महिलेला कोणीही असं करण्यापासून का थांबवलं नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा- बकरी ईदपूर्वी पालटलं गरीब शेतकऱ्याचं नशीब; ‘अल्लाह’ शब्दामुळे रातोरात बनला लखपती
लोक महिलेवर संतापले –
महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच दर्ग्याच्या खादीमांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, ही महिला कोण आहे, ती कुठून आली याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. अजमेर शरीफ हे मुस्लिम समाजातील १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे सूफी दर्गा आहे, जिथे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मातील लोक जातात.
हेही पाहा- ‘कुर्बानी’साठी आणलेला रेडा थेट लोकांच्या गर्दीत शिरला, अनेकजण जखमी, घटनेचा थरारक Video व्हायरल
याआधीही घडल्या आहेत अशा घटना –
दर्ग्यात महिलेने डान्स करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही एका मुलीने असाच व्हिडिओ बनवला होता. जो पाहून लोक चांगलेच संतापले होते. मात्र, नंतर मुलीने या कृत्याबद्दल माफी मागितली होती. शिवाय व्हिडीओ बनवण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असं त्या मुलीने म्हटलं होतं. महिलेचा व्हिडिओ व्हायरल होताच मुस्लिम समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. महिलेच्या या कृत्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. शिवाय असे प्रकार रोखण्यासाठी कर्मचारी तैनात असताना महिलेने इथे डान्स केलाच कसा? यावेळी कर्मचारी कुठे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.