लोकांचं मनोरंजन करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर भन्नाट पोज देऊन रिल्स बनवण्याची फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सिनेमा पाहून हिरोसारखं अभिनय करण्याचाही अनेक जण प्रयत्न करत असतात. नेटकऱ्यांसाठी सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यासाठी आताची तरुणपिढी काय करतील, याचा अंदाज बांधणे कठीण झालं आहे. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर इंडिया सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. लोकांच्या नजरेसमोरून अचानक गायब होण्यासाठी लाल चष्म्याचा वापर केला जातो, असे दृष्य या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. सोशल मीडियावरही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक सुंदर महिला कॅमेरासमोर जबरदस्त पोज देत असताना अचानक गायब होते. यामागे काय जादू असावी? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा – King Cobra Viral Video: चिमुकल्या बाळासारखी किंग कोब्राची शॅम्पूने केली आंघोळ, ‘असा’ थरारक व्हिडीओ यापूर्वी पाहिला नसेल

या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कार्यालयात शूट केल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोक संगणकावर काम करताना दिसत आहेत. एक महिला कॅमेरासमोर एक चमकणारा दुपट्टा घेऊन येते. त्यानंतर ती महिला दुपट्टा घेवून साडी नेसल्यासारखी पोज देते आणि अचानक कॅमेरा समोरून गायब होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जणू काही हा मिस्टर इंडिया सिनेमाचाच सिन आहे, असं वाटू लागतं.

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओची एडिटिंग अप्रतिम आहे, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या व्हिडीओला इतक्या सुंदर पद्धतीनं क्रिएट केलं आहे की, बघणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. सोशल मीडियाच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ @Enezator नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओत युजरने म्हटलंय, जपानी शास्त्रज्ञांनी गायब होण्याचा फॉर्म्यूला शोधून काढला. या व्हिडीओला जवळपास दोन लाख नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. तर हजारोंच्या संख्येत या व्हिडीओला लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सने कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, भाई क्रोमासारखं काहीतरी ऐकलं आहे, ही त्याचीच कमाल आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, फॉर्म्यूला शोधला आहे, असं आपण गृहीत धरलं, पण ही जादू कोणी केली आहे, ते सांगा…अन्य एक युजर म्हणाला, जर असं काही बनलं तर जगात विध्वंस होईल.