असं म्हणतात मोबाईलचा अतिवापर चांगला नाही पण आज प्रत्येक जण मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच. सोशल मीडियामुळे मोबाईलचा क्रेझ आणखी वाढत आहे. अनेकदा मोबाईलच्या नादात कोणाचा जीव जातो तर कधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी याच मोबाईलमुळे अनेक गमती जमती सुद्धा घडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोबाईलच्या नादात एका महिलेने असे काही केले की तुम्ही पोट धरून हसाल. ती चक्क नवऱ्याला विसरली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं प्रकरण काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हेही वाचा : “एखाद्याच्या संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्यानं डिवचलं म्हणून सिंह चवताळला, पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

हा व्हायरल व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपे दुचाकी घेऊन पेट्रोल पंपावर येतात. महिला फोनवर बोलत असते. त्यामुळे ती दुचाकीवरून खाली उतरते. ती फोनवर बोलता बोलता पेट्रोल पंपाच्या आजुबाजूला फिरत असते. तोवर तिचा नवरा पेट्रोल भरत असतो. फोनवर बोलता बोलता ती चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीवर बसते आणि निघून जाते. तिचा नवरा मात्र पेट्रोल भरताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?

marathiduniyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मोबाईलच्या नादात बायको नवर्‍याला विसरून गेली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्याने मागे बघितलं असत तर तो अनोळखी आहे हे सिद्ध झालं असत पण त्या पुढच्या दुचाकीस्वाराने मागे वळून बघितलं नाही. गैरसमज करू नका, समोरचा भाऊ पण असू शकतो नातलग असू शकतो पॉझिटिव्ह राहा” तर एका युजरने लिहिलेय, “हे तिघे जण फिरायला गेले असतील, आपल्याला काय माहिती…” आणखी एका युजरने लिहिलेय, “समोरचा तिचा भाऊ होता आणि मागचा नवरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman forgot her husband while talking on a call on mobile funny video goes viral on social media ndj