32 Year Old US Woman Breaks World Record: आजच्या जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. एकीकडे जग चंद्रावर जाण्याची तयारी करतेय तर दुसरीकडे लोक विचित्र गोष्टी करुन विश्व विक्रम करत आहेत. जगभरात असे अनेक लोक आहे जे प्रतिभावान आहे. कित्येक असे लोक आहेत ज्यांचे कौशल्य पाहून प्रत्येकजण थक्क होतात. असाच काहीसा प्रकार एका ३२ वर्षीय महिलेसोबत घडला आहे. या महिलेने अशी कामगिरी करुन दाखवली आहे की तिचे नाव थेट गिनिज बुकमध्ये नोंदविले आहे.
आतापर्यंत गिनिज बुकमध्ये नोंद झालेले अनेक विचित्र विक्रम तुम्ही ऐकले असतील, कोणाचे सर्वात जास्त उड्या मारण्यासाठी, कोणाचे जास्त दिवस धावण्यासाठी तर कोणाचे जास्त काळ झोपण्यासाठी विक्रम नोंदवले गेले आहेत. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला पायाचा पंजा १८० अंशामध्ये फिरवण्यासाठी केलेला विक्रम ऐकला आहे का? तुम्हाला कदाचित या गोष्टीवर विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे. न्यु मेक्सिको येथील ३२ वर्षीय महिलेने तिचे दोन्ही पंजे जवळपास १८० अंशापर्यंत फिरवू शकते, हे पाहून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल. तिचा हा कारनामा पाहून लोकांचे डोळे देखील गरागरा फिरतील.
पायाचा पंजा उलटा करू शकते ही महिला
केल्सी ग्रबने आपल्या पायाचे पंजे जवळपासू १७१.४ अंशाच्या कोनातत फिरवून एक नवीन गिनिज बुकमध्ये नाव नोंदवून जागतिक विक्रम केला आहे. जे काम सर्व सामान्य व्यक्तीसाठी अशक्य आहे ते काम केल्सी ग्रबने अगदी सहज करून दाखविले आहे. फोटोमघ्ये पाहू शकता, महिलेने आपले दोन्ही पाय पूर्णपणे उलट्य़ा दिशेने फिरवले आहेत. फोटोमध्ये पायाचा पुढचा पंजा मागे आणि मागची टाच पुढे केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा – बाप असावा तर असा! मुलांना नाचायला प्रोत्साहन देणारा ‘सुपर बाबा’, पाहा हृदयस्पर्शी व्हिडीओ
गिनिज बुकमध्ये झाली महिलेच्या कामगिरीची नोंद
गिनिद वर्ल्ड रेकॉर्डला केल्सी ग्रबने सांगितले की, तिने आपल्या विक्रमाबाबत तेव्हा समजले जेव्हा तिच्या सहकार्याने याबाबत कुठेतरी वाचले. त्याने सांगितले की, मी आताच लाईब्ररीमधून येत आहे. तिथे एक बातमी होती की एका महिलेने आपले दोन्ही पायाचे पंजे उलटे करू शकते. मी त्याच्या खांद्यावर हाथ ठेवाला आणि सांगितले की हे मीपण करू शकते. मला माहित होतो की माझा पाय खूप लवचिक आहे पण इतका याचा अंदाजा मला देखील नव्हता. अखेर मी माझ्या नावावर नवीन विक्रम नोंदवला आहे. मला यासाठी कोणतीही खास तयारी करावी लागली नाही.
तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटते? आम्हाला नक्की कळवा.