रेल्वे स्थानकावरच्या सुरक्षारक्षकांवर विश्वास नाही, म्हणून आपली मौल्यवान पर्स वाचवण्यासाठी एक महिला चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी तिला हा मूर्खपणा करण्यापासून रोखलं नाही. ‘पिअर्स व्हिडिओ’नं याचा व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बिकीनीतली सनी लिऑन करतेय शेताची राखण, शेतकऱ्याची जगावेगळी ‘डोकॅलिटी’
मिरर ऑनलाइनच्या माहितीनुसार चीनमधल्या एका रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानकात बॅग स्कॅन करण्यासाठी या महिलनं नकार दिला. आपली महगाडी बॅग आणि मौल्यवान वस्तू स्कॅनरमध्ये गेल्या तर सुरक्षा रक्षक त्याला नुकसान पोहोचवतील अशी भीती तिला वाटली त्यामुळे ती स्कॅनरमध्ये शिरली. पिअर्स व्हिडिओच्या माहितीनुसार तिथल्या एकही सुरक्षारक्षकानं तिला रोखलं नाही. ११ फेब्रुवारीला हा प्रसंग घडला. कदाचित या बॅगमध्ये पैसे असावे आणि ते सुरक्षा रक्षकांनी काढून घेऊ नयेत या भीतीनं ती स्कॅनरमध्ये शिरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO : पक्षांच्या थव्यासोबत उडणारा अवलिया!
पण, तिच्या बॅगमध्ये नेमकं काय होतं हे शेवटपर्यंत कळलं नाही. कारण स्कॅनिंग मशीनमधून बाहेर आल्यानंतर मात्र ट्रेन पकडण्यासाठी ती घाईत निघून गेल्याचंही म्हटलं आहे.