आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्वत:साठी वेळ काढणे कठीण झालं आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवणे जमत नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कोणी उत्तम आहाराचे पालन करतं तर कोणी व्यायाम आणि योगासने करतं. लोकं शरीरासाठी शक्य आहे ते सर्व काही करण्याचा प्रयत्न करतात, परंतु असे असूनही अनेकदा अपेक्षेप्रमाणे शरीरावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे अनेक लोक पटकन वजन कमी करण्यासाठी आपलं जेवण कमी करतात. परंतु काही लोक असे आहेत जे ते मनासारखा अन्न खाऊन देखील वजन कमी करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महिलेची जोरदार चर्चा सुरु आहे. जिने मनासारखा आहार घेऊन वजन कमी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३९ वर्षाच्या कर्टनी लूना नावाच्या महिलेने सिंहाचा डाएट (Lion Diet) फॉलो करुन तब्बल १९ किलो वजन कमी केलं आहे. या महिलेचे प्रकरण वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सांगितले जात आहे की, लुनाला तिचे वजन लवकरात लवकर कमी करायचे होते, त्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण तिचे वजन कमी होण्याऐवजी वाढतच गेले. या दरम्यान, तिच्या एका मित्राने तिला ‘सिंहाचा डाएट’ फॉलो करण्याचा सल्ला दिला. हा डाएट फॉलो केल्यानंतर महिन्याभरातच तिचे वजन १९ किलोने कमी झाल्याचे सांगितलं जात आहे. लुनाच्या म्हणण्यानुसार, सिंह डाएट फॉलो केल्यामुळेच तिचे १९ किलो वजन कमी झाले आहे. तर लुना ही दोन मुलांची आई आहे.

हेही पाहा- भयानक! अजगरानेच केली अजगराची शिकार; अर्धवट गिळलेल्या अवस्थेत जीव वाचवण्यासाठी धडपड, VIDEO व्हायरल

नेमका काय आहे सिंहाचा डाएट जाणून घ्या.

सिंहांच्या डाएटमध्ये प्राण्यांच्या मांसाबरोबर फक्त मीठ, पाणी आणि लोणी घेतले जाऊ शकते, असं सांगितले जात आहे. याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचे सेवन केलं जात नाही. एका संशोधनानुसार, सिंहाचा आहार वजन कमी करण्यासाठी तयार केलेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, योग्य चयापचय झाल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते, ज्यामुळे शरीर आपोआप वजन नियंत्रित करू लागते. तर फार पूर्वी लोक फक्त शिकारी होते, ते केवळ मांस खात असत, परंतु आजच्या काळात ते पचविणे सर्वांना शक्य नाही.

३९ वर्षीय कर्टनी लुनाने सांगितले की, ती फक्त मांस आणि प्राण्यांचे पदार्थ खाते. ती एका दिवसात ४५३ ग्रॅम मांसाहार आणि उकडलेली अंडी आणि बटर खाते. असे म्हटले जाते की, सिंहाचा आहार जीवन बदलू शकतो. वजन कमी करण्याव्यतिरिक्त, ते शरीरातील सूज देखील पूर्णपणे काढून टाकू शकते. तसेच अॅलर्जी, डोकेदुखी आणि निद्रानाश या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. पण अनेकांना केवळ मांस खाण्यामुळे भयंकर शाररीक समस्यांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे लुनाचा हा डाएट शरीरासाठी कसा लाभदायी ठरु शकतो असा प्रश्नदेखील नेटकरी उपस्थित करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman lost 19 kg weight in a month by following a lions diet see the viral diet plan jap
Show comments