VIDEO : पाणीपुरी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. ‘पाणीपुरी’ हा शब्द जरी उच्चारला तरी काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी फक्त माणसांनाच आवडत नाही, तर प्राण्यांनासुद्धा आवडू शकते. पाणीपुरी खातानाचा एका माकडाचा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क कुत्र्याला पाणीपुरी खाऊ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला तिच्या पाळीव कुत्र्याला पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे आणि हा कुत्रा आवडीने पाणीपुरी खाताना दिसत आहे. पाणीपुरी हा असा पदार्थ आहे की, ज्याची चव कोणालाही आवडते. या कुत्र्यालाही पाणीपुरीची चव आवडली आहे. त्यामुळे हा कुत्रा आवडीने पाणीपुरी खाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : ‘कावला’ गाण्यावर आजीचा जबरदस्त डान्स! तमन्ना भाटियालाही टाकले मागे; ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल थक्क
पाणीपुरी खातानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत. saintbernard_the_cutepuppy_ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “कुत्र्याला तेल, मैदा आणि मसाल्याचे पदार्थ कधीही खाऊ घालू नये.” तर एका युजरने लिहिलेय, “कुत्र्यांना असे पदार्थ चुकूनही देऊ नये.” आणखी एका युजरने लिहिलेय, “कृपया पाळीव प्राण्यांबरोबर असे करू नये. हे कुत्र्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही.”