Viral Video : स्त्रीमध्ये प्रचंड ताकद आहे. एका स्त्रीने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती यश मिळवण्यासाठी काहीही करू शकते. स्त्री जिद्द आणि चिकाटीने सर्व जबाबदार्‍या स्वीकारते आणि पूर्ण करते. आजची स्त्री एकाच वेळी असंख्य जबाबदारी स्वीकारताना दिसते. घरकाम, कुटुंब, आणि नोकरी सर्व हसतमुखाने सांभाळते. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस वर्दी घालून भाकरी तयार करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time inspirational video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला पोलीस दिसेल. तिने महाराष्ट्र पोलीसाची वर्दी घातली आहे. ती चक्क स्वयंपाकघरात भाकरी थापताना दिसत आहे. त्यानंतर ती तव्यावर ती भाकरी भाजताना सुद्धा दिसते. तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पोलीसाची नोकरी म्हणजे २४ तास काम असते. अशात महिला पोलीसांना दुहेरी जबाबदारी स्वीकारावी लागते. घर कुटुंब सांभाळत अनेक महिला पोलीस त्यांचं कर्तव्य सुद्धा पार पाडतात. या व्हिडीओमध्ये महिला पोलीसाला भाकरी बनवताना पाहून स्त्री शक्तीची जाणीव होते. एक महिला घर कुटुंबाची काळजी घेऊन समाजाची सेवाही करू शकते, हे तुम्हाला या व्हिडीओमधून दिसून येईल. अशा अनेक महिला पोलीस असेल ज्यांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते.

हेही वाचा : “हे कोल्हापूर आहे, येथे पैशाला किंमत नाही, पण…” कोल्हापूरचे ऑटोचालक काका लाख मोलाची गोष्ट बोलून गेले, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा

cop_gatha_112 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमचा पण संसार सुरू झालाय बरं का परंतु वर्दीबरोबर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका महिला पोलीस युजरने लिहिलेय, “नोकरी करून घर सांभाळायचं असते आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र” तर एका युजरने लिहिलेय, “कर्तव्य पण आणि संस्कार पण” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाई कितीही शिकली कितीही मोठ्या पदांवर राहीली तर तिला घर साभाळावच लागतं” एक युजर लिहितो, “सलाम तुमच्या कार्याला” तर एक युजर लिहितो, ” मॅडम तूमच्या कार्याला माझ्याकडून सलाम आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या महिला पोलीसावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.