सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय अनेकजण कधीकधी गमतीने शूट केलेला एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि नेमका तोच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. सध्या अशाच एका महिलेचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती एका दुकानाचं नाव वाचताना दिसत आहे. मात्र, दुकानाच्या नावाचा बोर्डवरील नाव ज्या पद्धतीने उच्चारते ते ऐकून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्याबरोबर असलेल्या महिलेला एका दुकानाच्या नावाचा बोर्ड वाचायला सांगत आहे. त्यावर व्हिडीओमधील महिला बोर्डवर लिहिलेले इंग्रजी भाषेतील नाव वाचते. ती म्हणते त्या बोर्डवर ‘अंटी की इंडिया’ (Aunty’s India) लिहिलेलं आहे. महिलेने वाचलेलं नाव ऐकून व्हिडीओ शूट करणारा माणूस जोरजोरात हसायला लागतो आणि तिला सांगतो ते ‘अंटी की इंडिया’ नाही तर ‘अँटिक इंडिया’ लिहिलं आहे. त्यावर ती महिला आत्मविश्वासाने आपणही तेच वाचलं असल्याचं सांगते आणि आपली चूक कळताच हसू लागते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
shivamadhu_ नावाच्या यूजर इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकजण त्यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने ने म्हटलं आहे की, हे नवीन इंग्रजी आहे. तर आणखी एकाने ‘अंटी का इंडिया’ असं लिहिलं आहे. तर अनेकांनी त्यांनी हा व्हिडीओ जाणूनबुजुन बनवल्याचं म्हटलं आहे.