Viral Video : उखाणा घेणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त स्त्रिया उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळीसुद्धा आवडीने उखाणा घेतात. कोणताही शुभ समारंभ असो किंवा लग्नसमारंभ आवडीने उखाणा विचारला जातो. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही उखाणे एवढे भन्नाट असतात की पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका सार्वजानिक कार्यक्रमात काकूने असा उखाणा घेतला आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a woman said funny ukhana and said next time I want Mukesh ambani video goes viral on social media)
काकूंचा मजेशीर उखाणा
हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक अँकर दिसेल. त्याच्या शेजारी चार पाच महिला उभ्या आहेत. अँकर महिलांना उखाणे घेण्याचा आग्रह धरतो. त्यावर एक महिला मजेशीर उखाणा घेते. काकूंचा हा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल.
काकू उखाणा घेताना म्हणते, “नैसर्गिक साधनसंपत्ती आहे अनमोल ठेवा, या जन्मी मनोजराव चालतील, पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा” काकुंचा उखाणा ऐकून इतर महिला व अँकर जोरजोराने हसताना दिसतात. प्रेक्षक सुद्धा जोरजोराने हसताना दिसतात. त्यानंतर अँकर मजेशीरपणे त्यांच्या पतीला विचारतात, “काय सर?” त्यावर काका दोन्ही हात वर करून स्मित हास्य देतात. त्यानंतर अँकर म्हणतो, “पुढच्या वर्षी मुकेश अंबानी होऊन तुमच्याच नशीबी येणार.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अँकरने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अंंबानीवर उखाणा”. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ताई एवढ्या पैशावर प्रेम करता का?” तर एका युजरने लिहिलेय, “काका लगेच नावं बदलुन मुकेश अंबानी ठेवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “काकू लय भारी आहे” एक युजर लिहितो, “खूप भारी” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.